World AIDS Day : निरोगी बाळाच्या जन्माने ‘एचआयव्ही’ग्रस्त मातांना नवजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 12:40 PM2021-12-01T12:40:17+5:302021-12-01T12:41:59+5:30

World AIDS Day : नियमित औषधोपचार, सकस आहार आणि सकारात्मक विचाराचा परिणाम

World AIDS Day: Rebirth of HIV-infected mothers with the birth of a healthy baby | World AIDS Day : निरोगी बाळाच्या जन्माने ‘एचआयव्ही’ग्रस्त मातांना नवजीवन

World AIDS Day : निरोगी बाळाच्या जन्माने ‘एचआयव्ही’ग्रस्त मातांना नवजीवन

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एचआयव्ही, एड्स ( AIDS ) म्हटले की आजही नागरिक चार हात दूर राहतात, अनेकांना या आजारांच्या नावानेच घाम फुटतो. जिल्ह्यात जवळपास २० गरोदर मातांना ‘एचआयव्ही’चे निदान झाले, तेव्हा आपल्या बाळाला जन्मापासूनच नरकयातना भोगाव्या लागणार, या विचारानेच या महिला आणि त्यांची कुटुंबे गलितगात्र बनली. मात्र वेळेवर घेतलेल्या औषधोपचाराने या मातांनी ‘एचआयव्ही’मुक्त निरोगी बालकांना जन्म दिला (Rebirth of HIV-infected mothers with the birth of a healthy baby) . एकप्रकारे या बालकांनी मातांना नवे आयुष्य मिळाले.

असुरक्षित लैंगिक संबंध यासह इतर काही कारणांमुळे एचआयव्ही (एड्स) आजार होतो. या आजारावर प्रभावी आणि परिणामकारक औषधे मिळावीत यासाठी संशोधन सुरू आहे. यातूनच विविध प्रकारच्या गुणकारी औषधांचा शोध लागला आहे; परंतु तरीदेखील या आजारातून रुग्णाला पूर्णत: बरे करणारी औषधे अद्याप निर्माण झालेली नाहीत. मात्र, या औषधांनी रुग्णांचे आयुर्मान वाढविले हे मात्र निश्चित. गर्भवती महिला एचआयव्हीबाधित असेल, तर तिच्या बाळालाही या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अशा मातांना घाटी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, इतकेच नव्हे, एआरटी सेंटर्सशी जोडून त्यांना एचआयव्हीला प्रतिकार करणारी औषधे सुरू करण्यात येतात.जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्त गरोदरमाता नियमित औषधोपचार घेतील, सकस आहार आणि सकारात्मक विचार ठेवतील याची काळजी घेतली जाते. औषधोपचार सुरू असतानाच गर्भवतीच्या आणि बाळाच्या सहावा आठवडा, सहावा महिना, बाराव्या आणि अठराव्या महिन्यात वेळोवेळी आवश्यक तपासण्या करून घेण्यात आल्या. यामध्ये २० गरोदर मातांची बाळे पूर्णत: निरोगी असल्याचे आढळून आले.

वेळेवर औषधोपचार
जिल्ह्यात एचआयव्ही पाॅझिटिव्ह आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. एचआयव्हीग्रस्त गरोदर मातेपासून होणाऱ्या शिशूलाही एचआयव्ही होण्याचा धोका असतो. परंतु गेल्या वर्षभरात २० गरोदर मातांनी जन्म दिलेले शिशू एचआयव्ही निगेटिव्ह राहिले. वेळेवर औषधोपचार आणि पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.
- संजय पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक

Web Title: World AIDS Day: Rebirth of HIV-infected mothers with the birth of a healthy baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.