अॅलोपॅथीच्या जगात आयुष तग धरून
By Admin | Published: May 28, 2014 11:50 PM2014-05-28T23:50:11+5:302014-05-29T00:39:04+5:30
शिरीष शिंदे , बीड आजच्या धावत्या युगात मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाणही त्याच पटीत वाढले आहे.
शिरीष शिंदे , बीड आजच्या धावत्या युगात मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाणही त्याच पटीत वाढले आहे. आजार मुळापासून नष्ट होण्यासाठी अनेकजण प्रभावी उपचार पद्धती म्हणून आयुषला प्राधान्य देत आहेत. या संर्दभात जिल्हा रुग्णालयातील आयुषचे जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सचिन वारे यांनी‘लोकमत’शी खास मुलाखात दिली. आयुष सर्दभात बोलताना डॉ. वारे म्हणाले, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेर्तंगत जिल्ह्यात आयुष पॅथीला सुरुवात झाली. आयुष अंर्तगत आर्युवेद, योगा, युनानी व होमिओपॅथी या चार पॅथी द्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. आयुषला जिल्ह्यात २००९ सालामध्ये सुरुवात झाली होती मात्र त्याचे प्रत्यक्ष काम २०१० मध्ये सुरुवात झाले. मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे. त्यातुलनेत आजारांचे प्रमाणही तसेच वाढलेले आहे. अनेकरुग्ण रुग्ण आयुष उपचार पद्धती घेत असल्याचे समोर आले असल्याचे डॉ. वारे यांनी सांगितले. अॅलोपॅथीचा प्रचार व प्रसार, तसेच त्यात होणार संशोधन अशा परिस्थितही आयुष उपचार पद्धती आपले स्थान कायम बनवुन आहे. आयुषचा उपचार घेणार्या संख्या पाहिली असता लाभ घेणार्या रुग्णांची संख्या वर्षागणिक वाढतच गेलेली असल्याचे आकडेवारीनुसार समजुन येते. २०१०-११ मध्ये १ लाख ४० हजार ८७७, २०११-१२ साली १ लाख ९६ हजार ३८६, २०१२-१३ साली २ लाख ५३ हजार ०१६ तर २०१३-१४ मध्ये २ लाख ८८ हजार ४३३ ऐवढ्या रुग्णांनी आयुष योजनेचा लाभ घेतला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी केज या उप-जिल्हा रुग्णालयात तर पाटोदा, आष्टी, माजलगाव व धारुर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आयुषच्या पॅथीद्वारे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॅथीसाठी ३ डॉक्टरर्स नेमण्यात आले आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात असणार्या आयुष कक्षात सुरु असलेल्या पॅथीद्वारे उपचार केले जात आहे. निसर्ग उपचार पद्धतीद्वार पंचकर्म, शिरोधारा, स्रेहल स्वेदन, होमिओपॅथीद्वारे मुतखडा, महिलांच्या गर्भाषयाचे आजार, बालरोग, त्वचा विकार, संधिवात आदी आजरांवर उपचार केले जात आहेत. युनानी पद्धतीद्वारे,पित्ताचे आजार, जठराचे आजार, सांधे दुखी, मुतखडा, दमा, अॅलर्जी आदीवर उपचार केले जातात. तसेच योग पद्धती कशा करायच्या त्याचेही प्रशिक्षण देण्यात येते. आयुषसाठी आरोग्य विभागाच्यावतीने भरपुर गोळ्या-औषधी देण्यात येतात. त्यामुळे आयुषमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत नाही. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांच्या कार्यकाळात आयुष कक्ष स्थापन झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोगले यांच्या सहकार्यातुन आयुषचे कार्य अखंडपणे सुरु आहे.