जागतिक सर्प दिन विशेष : १८ सापांना आदिवासात जीवनदान

By साहेबराव हिवराळे | Published: July 16, 2023 09:02 PM2023-07-16T21:02:58+5:302023-07-16T21:03:11+5:30

सापाचे महत्त्व पटवण्यासाठी प्रबोधन

World Snake Day Special: Giving life to 18 snakes in jungle | जागतिक सर्प दिन विशेष : १८ सापांना आदिवासात जीवनदान

जागतिक सर्प दिन विशेष : १८ सापांना आदिवासात जीवनदान

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : १६ जुलै हा दिवस सर्वत्र जागतिक सर्प दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्प व त्याच्या विविध प्रजातींविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी, सापांचे संवर्धन व्हावे यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्पमित्रांनी तब्बल १८ साप वन विभागाच्या आदिवासात सोडले. शनिवारी सोडण्यात आलेल्या सापांमध्ये धामण, नाग, अजगर यांचा समावेश होता.

पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पकडलेल्या १८ विषारी व बिनविषारी सापांना वन विभागाच्या मदतीने सातारा परिसरातील डोंगर भागात वनक्षेत्रात आदिवासात मुक्त करण्यात आले. जागतिक सर्पदिनी सापाचे महत्त्व जनतेलाही पटवून देण्यासाठी तसेच जनजागृतीकरिता हा प्रयत्न करण्यात आला. वन विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर, सर्पमित्र -संघानंद शिंदे, सुरेश साळवे, मनोज गायकवाड, सुहास अंभोरे वनपाल तागड, वनरक्षक -विश्वास साळवे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

सर्पमित्र काय सांगतात...

सापांना मारू नका, सापांना पकडण्याचे एक तंत्र आहे. त्यांचे दात ते त्यांच्या विषासाठी वापरतात. नाग साप वाचविण्यासाठी प्रथम सापां बद्दलचे समज -गैरसमज व अंधश्रद्धा दूर होऊन समाज सज्ञान होणे गरजेचे आहे. शहर व जिल्हा परिसरात फक्त ४ प्रजातीचे विषारी साप आढळतात, ते म्हणजे नाग, मण्यार, घोणस, फुरसे आदी होय. इतर सर्व साप हे बिनविषारी आहेत हे लक्षात घ्या.

काय करायला हवे...

साप दिसला की त्याला मारा, ही समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. सापांच्या लपण्याच्या व अडचणीच्या जागा कमी केल्या पाहिजेत. घराचा परिसर स्वच्छ असावा, अडगळीचे सामाने ठेवू नये, सरपण आणि गवताची साठवणूक एका उंचीवर करावी. घरांच्या खिडक्यांच्या जवळ झाडे, वेली लावू नये. परिसरात डबके साचणार नाहीत ही खबरदारी घ्यावी.

अन्नसाखळीत साप महत्वाचा....

उंदरांची संख्या सीमित ठेवण्यासाठी निसर्गाने सापांची निर्मिती केली आहे. एक उंदराची जोडी वर्षाला ८८८ पिलाना जन्म देते आणि एक धामण एका आठवड्याला ५ उंदीर खाते. तर वर्षाला २६० उंदीर खाते. धामणीच वय २० वर्षांच असते. एक धामण मारली तर कोट्यवधी उंदरांचा जन्म होत असतो. शासकीय आकडेवारीनुसार दरवर्षी उंदीर आणि घुशी अन्नधान्याच्या उत्पादनातील ३० टक्के नुकसान करते. उंदरांमुळे अनेक जीवघेण्या रोगांना आमंत्रण मिळत असते. नुकसान टाळण्यासाठी सापांचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

 

Web Title: World Snake Day Special: Giving life to 18 snakes in jungle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.