चिंता ! शहराचा कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट वाढला, सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 03:53 PM2022-01-04T15:53:17+5:302022-01-04T15:54:27+5:30
दिवसभरात २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांना सुटी देण्यात आली.
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ३७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील २९ आणि ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. शहरात रोज नव्या भागात रुग्णांचे निदान होत आहे. शिवाय ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दिवसभरात २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार १८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४९ हजार ९३६ झाली आहे. आतापर्यंत एकूण ३६५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात सर्वाधिक ६९ सक्रिय रुग्ण हे शहरातील आहेत. ग्रामीण भागातील २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना वैजापूर तालुक्यातील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
असा वाढला पाॅझिटिव्हिटी रेट
शहरात २७ डिसेंबर पाॅझिटिव्हिटी रेट ०.१६ टक्के होता. या दिवशी शहरात ४ रुग्णांची वाढ झाली होती. आठ दिवसांत शहरातील नव्या रुग्णांची संख्या ४ वरून सोमवारी २९ वर गेली. पाॅझिटिव्हिटी रेट १.२१ टक्के राहिला.
मनपा हद्दीतील नवे रुग्ण
शेवाळे हॉस्पिटल परिसर १, श्रीनिवास रेसिडेन्सी १, शिवाजीनगर १, आदिनाथनगर १, राम अपार्टमेंट, अजबनगर १, चेतनानगर १, गारखेडा परिसर १, हर्सूल टी पॉइंट १, एन-दोन येथे १, रेल्वे स्टेशन १, बन्सीलालनगर १, जयसिंगपुरा १, विश्रामबाग कॉलनी, पदमपुरा १, अन्य १६
ग्रामीण भागातील नवे रुग्ण
ग्रामीण भागात औरंगाबाद तालुक्यात ३, गंगापूर २, कन्नड १, पैठण २
अशी वाढतेय रुग्णसंख्या
तारीख - ग्रामीण-शहर
२७ डिसेंबर - ०-४
२८ डिसेंबर - ०-९
२९ डिसेंबर - १-१५
३० डिसेंबर - २-१४
३१ डिसेंबर - ४-१४
१ जानेवारी - १०-१६
२ जानेवारी- ७-२८
३ जानेवारी-८-२९