व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:02 PM2024-01-05T16:02:17+5:302024-01-05T16:02:38+5:30

उडान योजनेसाठी, जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे

Wow..! Another big flight from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai in the morning | व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

छत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाने सकाळच्या वेळेतील मुंबई- छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमान एअरबस ए-३१९ वरून एअर-३२० मध्ये बदलले आहे. हे विमान १८६ आसनी आहे, अशी माहिती टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.

नव्या विमानामुळे सकाळच्या वेळी मुंबईला जाण्यासाठी ६० प्रवाशांची वाढीव आसने उपलब्ध झाली आहेत. आधीचे विमान १२६ आसनी होते. एअर इंडिया व्यवस्थापनाने प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण केल्याचे सुनीत कोठारी यांनी सांगितले. याबरोबर छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. उडान योजनेत समावेश झाल्यास जयपूर- उदयपूर- छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर- वाराणसी- छत्रपती संभाजीनगर विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘पोर्ट ऑफ कॉल’ म्हणून हवा समावेश
चिकलठाणा विमानतळाचा ‘पोर्ट ऑफ काॅल’ म्हणून समावेश करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चार्टर विमानसेवेसह नियमित आंतरराष्ट्रीय सेवेसाठी ही बाब आवश्यक आहे, असे टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंत सिंग यांनी सांगितले. यातून दुबई, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल.

Web Title: Wow..! Another big flight from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.