व्वा रे चालाखी ! सिलिंडर २३४ रुपयाने वाढविले अन्‌ केवळ १० रुपये कमी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 07:34 PM2021-04-03T19:34:54+5:302021-04-03T19:36:02+5:30

The price of a cylinder was increased by Rs 234 and the price was reduced by only Rs 10 दर महिन्याला सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सरकारने सर्वसामान्यांना पोळून काढले आहे.

Wow, clever! The price of a cylinder was increased by Rs 234 and the price was reduced by only Rs 10 | व्वा रे चालाखी ! सिलिंडर २३४ रुपयाने वाढविले अन्‌ केवळ १० रुपये कमी केले

व्वा रे चालाखी ! सिलिंडर २३४ रुपयाने वाढविले अन्‌ केवळ १० रुपये कमी केले

googlenewsNext
ठळक मुद्देज्याप्रमाणे दर वाढविले त्या प्रमाणात कमी करा सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांवर स्थिर ठेवा, असे जनतेचे म्हणणे आहे.

औरंगाबाद : पाच महिन्यांत २३४ रुपयांनी वाढविलेल्या सिलिंडरच्या किमती आणि एप्रिल महिन्यात केवळ १० रुपयांनी सिलिंडरचे दर कमी करून महागाईवर सारवासारवी करण्याचा केलेला प्रयत्न. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्यांची केलेली एकप्रकारे क्रूर चेष्टाच आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे.

कोरोनाने आधीच सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटून टाकली आहे. अशातच दर महिन्याला सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सरकारने सर्वसामान्यांना पोळून काढले आहे. तेल, धान्य, पेट्रोल, डिझेल या जोडीला घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीचाही भडका उडाला आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता आता होरपळून निघत आहे. त्यामुळे जर सिलिंडरच्या किमती कमी करायच्या असतील तर ज्याप्रमाणे दर वाढविले त्या प्रमाणात कमी करा आणि सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांवर स्थिर ठेवा, असे जनतेचे म्हणणे आहे.

२३४ रुपयांनी वाढले दर
औरंगाबाद शहरात घरगुती वापराचे सिलिंडर नोव्हेंबर २०२० मध्ये ५९४ रुपयांना मिळत होते. एकाच महिन्यात किमती १०० रुपयांनी वाढल्या आणि सिलिंडर ६९४ रुपयांना मिळू लागले. फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरची किंमत ७६९ रुपये झाली तर मार्च महिन्यात तब्बल ८२८ रुपये सिलिंडरसाठी मोजावे लागले.

गरिबांना घेणे शक्य नाही
सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीला खरोखरच आता वैतागलो आहे. प्रत्येक वेळी सिलिंडर घेताना मागच्या पेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात, सरकारने एकीकडे उज्वला गॅस दिले, मात्र सिलिंडरच्या किमती आता इतक्या वाढवून ठेवल्या की, गरिबांना ते घेणेही शक्य नाही. या गोष्टीकडे कुठल्याही राजकीय पक्षांचे लक्ष नाही, गरीब जनता मात्र मरत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांपेक्षा जास्त नको.
- डॉ.योगिता कथले

सर्वसामान्यांची चेष्टा आहे
किंमत वाढविताना भरमसाठ वाढविणे आणि कमी करताना मात्र केवळ १० रुपयांनी कमी करणे, ही तर सर्वसामान्यांची चेष्टा आहे. दर महिन्याला निदान ५० रुपये याप्रमाणे शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती पुढील काही महिन्यांमध्ये कमी केल्या पाहिजेत. गॅस सिलिंडर घेणे आता खरोखरच हळूहळू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होत आहे.
- रेखा नाडे

असे वाढले दर -
नोव्हेंबर २०२०- ५९४ रुपये.
डिसेंबर २०२०- ६९४ रु.
जानेवारी २०२१- ६९४ रु.
फेब्रुवारी २०२१- ७६९ रु.
मार्च २०२१- ८२८ रु.
एप्रिल २०२१- ८१८ रु.

Web Title: Wow, clever! The price of a cylinder was increased by Rs 234 and the price was reduced by only Rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.