व्वा! सरकारी रुग्णालयात सातासमुद्रापारचे रुग्ण; छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढते मेडिकल टुरिझम

By संतोष हिरेमठ | Published: May 20, 2023 08:13 PM2023-05-20T20:13:32+5:302023-05-20T20:13:39+5:30

येमेनपासून तर अमेरिकेपर्यंतच्या परदेशी रुग्णांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये औषधोपचार

Wow! Overseas patients in government hospitals; Medical tourism increased in Chhatrapati Sambhajinagar | व्वा! सरकारी रुग्णालयात सातासमुद्रापारचे रुग्ण; छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढते मेडिकल टुरिझम

व्वा! सरकारी रुग्णालयात सातासमुद्रापारचे रुग्ण; छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढते मेडिकल टुरिझम

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणीमुळे जगभरातील पर्यटक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होतात. ऐतिहासिक स्थळांबरोबर स्वस्तात उपचार करून घेण्यासाठी सातासमुद्रापार राहणाऱ्या रुग्णांची पावले छत्रपती संभाजीनगरकडे वळत आहेत. खासगी, कॉर्पोरेट रुग्णालयांबरोबर सरकारी रुग्णालयातही परदेशी रुग्ण उपचार घेण्यास पसंती देत आहेत.

मेडिकल टुरिझम ही काही नवीन संकल्पना नाही, विदेशामध्ये रुजलेली ही संकल्पना आहे. बऱ्याच देशांत डेंटल इन्शुरन्स नावाचा विमा असतो. ज्या लोकांकडे असा विमा नसतो त्यांना तेथील उपचार परवडूच शकत नाहीत. मग ते छोट्या देशात जाऊन उपचार घेतात आणि त्यासाठी आता छत्रपती संभाजीनगरला प्राधान्यक्रम वाढत असल्याची परिस्थिती आहे. दंतोपचारासाठी अनेक उपचारांसाठी परदेशी रुग्ण शहरात येत आहेत.

कोणकोणत्या देशातील रुग्ण शहरात?
शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) आतापर्यंत येमेन येथील आठ रुग्णांनी उपचार घेतले. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी रुग्णसेवेसाठी प्रयत्न केला जात आहे. ७ एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत येमेन, इंग्लंड येथील सहा रुग्णांनी उपचार घेतले, असे डाॅ. मिलिंद वैष्णव यांनी सांगितले. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत तीन परदेशी रुग्णांनी उपचार घेतले. केनिया, येमेनच्या रुग्णांचा यात समावेश आहे, अशी माहिती रुग्णालयाचे प्रशासक डाॅ. हिमांशू गुप्ता यांनी दिली, तर फेब्रुवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत पोलंड, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथील एकूण सात रुग्णांनीही शहरात उपचार घेतले.

कोणत्या आजारांवर उपचार?
प्रामुख्याने कॅन्सर, दंतोपचार, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, आदींसाठी परदेशी रुग्ण शहरात येत आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
रुग्णालयाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. उपचारासाठी विदेशातून रुग्ण येत आहेत. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो.
- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

प्रमाण वाढते
परदेशातून उपचारांसाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरात परदेशी विद्यार्थी शिकण्यासाठी आहे. असे विद्यार्थीही नातेवाइकांना उपचारांसाठी शहरात आणतात.
- डाॅ. यशवंत गाडे, अध्यक्ष, ‘आयएमए’

जिल्ह्यातील सरकारी, खासगी रुग्णालये
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
- शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था)
- शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
- सुपर स्पेशालिटी ब्लाॅक (घाटी)
- जिल्हा सामान्य रुग्णालय
- राज्य कामगार विमा योजना रुग्णालय
- छावणी रुग्णालय
- उपजिल्हा रुग्णालये- ३
- ग्रामीण रुग्णालये- १०
- ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र- ५१
- ग्रामीण आरोग्य उपकेंद्र- २५६
- महापालिकेची रुग्णालये- ६
- मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र- ३५
- शहरात खासगी रुग्णालये- ५५०
- ग्रामीण भागात खासगी रुग्णालये- ३३३

Web Title: Wow! Overseas patients in government hospitals; Medical tourism increased in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.