Video: लिहून घ्या, भुमरे पुढचे आठ दिवसच पालकमंत्री राहतील; चंद्रकांत खैरे यांचा दावा

By बापू सोळुंके | Published: April 14, 2023 05:46 PM2023-04-14T17:46:50+5:302023-04-14T17:48:03+5:30

मातोश्रीला महत्व नाही म्हणता मग तिथे जाऊन का रडले? हे सत्य आहे, तिथे जाऊन हे ढसाढसा रडले.

Write it down, Sandipan Bhumare will be the Guardian Minister for only eight days; Chandrakant Khaire's claim | Video: लिहून घ्या, भुमरे पुढचे आठ दिवसच पालकमंत्री राहतील; चंद्रकांत खैरे यांचा दावा

Video: लिहून घ्या, भुमरे पुढचे आठ दिवसच पालकमंत्री राहतील; चंद्रकांत खैरे यांचा दावा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: आठ दिवसांत सर्वोच्च न्यायायलात १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार आहे, यामुळे संदीपान भुमरेहे केवळ आठ दिवसच पालकमंत्री राहतील, असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आज केला. लिहून घ्या, माझं हे विधान सूर्यनारायण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या साक्षीने असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकल गेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास खैरे यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जे घटनाबाह्य काम करतील त्यांना बाबासाहेब कधीही माफ करणार नाहीत. असे नमूद करीत त्यांनी भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य केले. अनेक जण घटनाबाह्य काम करत आहेत, यामुळेच वज्रमूठ सभेत घटनेचे पूजन केलं गेलं, असा खुलासा देखील खैरे यांनी केला.

मग मातोश्रीवर जाऊन कशाला रडले?
मातोश्रीला महत्व नाही म्हणता मग तिथे जाऊन का रडले? हे सत्य आहे, तिथे जाऊन हे ढसाढसा रडले. भुमरे यांच्यामागे आता ईडी लागेल. दोन करोडोची गाडी घेतली, बारा दारूची दुकाने घेतली, हे कसे झाले, अशी टीका देखील खैरे यांनी केला आहे.
 

Web Title: Write it down, Sandipan Bhumare will be the Guardian Minister for only eight days; Chandrakant Khaire's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.