खुलताबाद नगर परिषद कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:16+5:302021-07-02T04:04:16+5:30
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या एकूण थकबाकी रकमेतून पहिला हप्ता एक रकमी देण्यात यावा, पदोन्नतीच्या फरकाची रक्कम ...
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या एकूण थकबाकी रकमेतून पहिला हप्ता एक रकमी देण्यात यावा, पदोन्नतीच्या फरकाची रक्कम संबंधीत कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग शासन निर्णयानुसार दहा वर्षे, वीस वर्ष व तीस वर्षे कालबद्ध पदोन्नती मंजूर करण्यात यावी. नगर परिषदमधील वर्ग - ३ व वर्ग - ४ या कर्मचाऱ्यांना घरकुल मंजूर करावे आदी मागण्यांसाठी बुधवारपासून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शहजाद बेग, उपाध्यक्ष अंकुश भराड पाटील, सचिव जितेंद्र बोचरे, कासिम बेग, कोषाध्यक्ष जे. के. चौधरी, संभाजी वाघ, प्रमोद पाटील, भाऊसाहेब तंबारे, सुखदेव घुसळे, सतीश देवरे, मुख्तार अहेमद, शेख इरफानोद्दीन, कलीमोद्दीन, गणेश पवार, सुदाम मुरकुंडे, शेषराव फुलारे, सय्यद सलीम, अप्पाराव देवकर, अशोक जगताप, अशोक भंडारे आदी सहभागी झाले आहेत.
फोटो कॅप्शन : खुलताबाद नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे.