दहावी मूल्यांकनाच्या यायसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:42+5:302021-06-22T04:05:42+5:30
--- दहावीचा निकाल : विषय शिक्षकांनाही मुल्यांकनात अडचणी, निकालाला उशीर होण्याची शक्यता --- औरंगाबाद : दहावीच्या विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ...
---
दहावीचा निकाल : विषय शिक्षकांनाही मुल्यांकनात अडचणी, निकालाला उशीर होण्याची शक्यता
---
औरंगाबाद : दहावीच्या विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुणतक्त्यासह निकाल शाळा समितीकडे २० जुनपर्यंत सादर करायचा होता. ते काम अद्याप अपुर्ण आहे. तर शाळा समितीने हे निकाल प्रमाणीत करुन मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीमध्ये भरायला सोमवारी सुरुवात होणार होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठीची ती लिंकच राज्य मंडळाकडून मिळाली नाही. त्यामुळे मुल्यांकनाला सोमवारी सुरुवात झाली नसल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव आर.पी. पाटील यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे परीक्षा न घेताच नववीचे गुण आणि दहावीच्या मूल्यांकनानुसार निकाल लावण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मूल्यमापनाची गुण विभागणीची पद्धत संपूर्ण सूचना न वाचल्याने शिक्षकांना अद्याप समजलीच नाही. त्यामुळे शिक्षण मंडळात वारंवार फोन करून विचारणा केली जात आहे. त्यामुळे पहिल्या वेळापत्रकातील काम सुरु झालेले नसल्याचे समोर आले असून मूल्यांकनासाठीचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु होणार होता. त्यासाठी आवश्यक लिंक न मिळाल्याने ते काम पुढील दोन दिवसांत सुरु होण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे लिंक आता २३ जूनपासून सुरु होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
--
परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचाच लागणार निकाल
---
दहावीर्ची परीक्षा रद्द झाली असली तरी ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठीचा अर्ज भरला त्यांना बैठक क्रमांक देऊन त्यांचाच निकाल लावण्यात येणार असल्याचे विभागीय मंडऴाचे विभागीय सचिव राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
--
दहावीचे विद्यार्थी ७३,८०३
दहावीचा अर्ज केलेले विद्यार्थी ६५,०११