यंदा फटाका विक्रीत २० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 07:58 PM2018-11-10T19:58:45+5:302018-11-10T19:59:00+5:30
वाळूज महानगर : यंदाच्या दिवाळीला फटाक्याचे भाव १० टक्के वधारल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत जवळपास २० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या दिवाळीत जवळपास ४० ते ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. अपेक्षेप्रमाणे विक्री न झाल्याने कमाई होऊ शकली नाही.
वाळूज महानगर : यंदाच्या दिवाळीला फटाक्याचे भाव १० टक्के वधारल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत जवळपास २० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या दिवाळीत जवळपास ४० ते ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. अपेक्षेप्रमाणे विक्री न झाल्याने कमाई होऊ शकली नाही.
वाळूज औद्योगिकनगरीत दरवर्षी दिवाळी सणाला फटका बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे फटाका विक्री व्यवसाय धोक्यात आला आहे. दिवाळीत फटाके विक्री करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्यावतीने जाचक अटी विक्रेत्यावर लादण्यात आल्या. या अटीमुळे फटका विक्रेत्यांची संख्या दोन वर्षांपासून घटत आहे.
अशातच यंदाच्या दिवाळीला न्यायालयाकडून फटाके वाजविण्यासाठी वेळेचे बंधन घातल्यामुळे फटाके खरेदीत ग्राहकांचा उत्साह दिसून आला नाही. यंदा परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळीची स्थिती असून, खरीप हंगामही वाया गेला आहे. बाजारपेठेत ग्राहकांची फारशी गर्दी नसल्यामुळे विक्रेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
या वर्षी कारखान्याकडून कामगारांना उशिरा बोनस वाटप झाल्यामुळे तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून कामगारांना दिवाळीच्या सुटी दिल्यामुळे खरेदीसाठी कामगार ग्राहकांना वेळ मिळाला नाही. या भागात रांजणगाव, वाळूज, पंढरपूर आदी ठिकाणी दिवाळीच्या आठवडाभर अगोदर फटका बाजार सजत असतो. मात्र यंदाच्या दिवाळीत फटका विक्रेत्यांना दुकाने सुरु ठेवण्यासाठी विविध कागदपत्राची जुळवा-जुळव करण्यातच खुप वेळ गेल्यामुळे विक्रेत्यांची संख्या घटली होती. गतवर्षी दिवाळीत या परिसरात जवळपास १०० विक्रेत्यांनी स्टॉल फटाक्याची दुकाने थाटली होती. यंदाच्या दिवाळीत विक्रेत्यांची संख्या घटुन ७० च्या आसपासपर्यंतच होती.
नफा उधारीत अडकला
फटाके शिल्लक राहिल्यास अर्थिक नुकसान सोसावे लागण्याची भिती असल्यामुळे अनेक विक्रेत्यांनी ‘अर्धे नगद-अर्धे उधार’ या पद्धतीने फटाके विक्री केल असून झालेला नफा उधारीत आडकल्याचे सुर्यभान काजळे, अन्सार पठाण, अशोक काकडे, रामेश्वर नवले, एस.एन.पाटील या विक्रेत्यांनी सांगितले.
--------------------------------------