यंदा विठ्ठलाच्या दर्शनासाठी राहणार एकच रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:32 PM2019-07-02T22:32:44+5:302019-07-02T22:33:02+5:30
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणा-या महिला व पुरुष भाविकांची एकच रांग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाळूज महानगर : पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणा-या महिला व पुरुष भाविकांची एकच रांग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिंडीद्वारे दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी दर्शनाची खास व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना मंदिरात थेट प्रवेश देण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.
आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मंगळवारी पोलीस प्रशासन व संस्थान पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीला एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव भिकाजी खोतकर, माजी अध्यक्ष रत्नाकर पा.शिंदे, माजी जि.प.सदस्य अनिल चोरडिया,पंढरपूचे सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, वळदगावचे सरपंच कांतराव पा.नवले, अप्पासाहेब झळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
१२ जुलै रोजी आषाढी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात जवळपास १० लाख भाविकांंची गर्दी होत असते. कामगार चौक व तिरंगा चौकापासून दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आली आहे. यात्रेत चोºया रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांबरोबर व संस्थानचे स्वंयसेवक तैनात राहणार आहेत. भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी माजी पं. स. सदस्य गणेश नवले, कल्याण नवले, देवीदास आदमाने, प्रकाश झळके, सुभाष साबळे, शेख जावेद, राधाकिसन नवले, दीपक कानडे, सहायक फौजदार राजेंद्र मोरे, राजेश वाघ, पोहेकॉ.रामदास गाडेकर, पोना. संजय हंबीर आदीसह वळदगाव व पंढरपूरच्या ग्रामस्थांची उपस्थिती होती.