यंदा अडीच महिन्यात ज्वारी पोटऱ्यात

By Admin | Published: January 7, 2017 12:00 AM2017-01-07T00:00:06+5:302017-01-07T00:03:02+5:30

बीड यंदा अतिवृष्टीमुळे तब्बल एक महिन्याच्या अवधीनंतर रबीच्या पेरण्या झाल्या होत्या.

This year, in the second half of the jawar potatoes | यंदा अडीच महिन्यात ज्वारी पोटऱ्यात

यंदा अडीच महिन्यात ज्वारी पोटऱ्यात

googlenewsNext

राजेश खराडे बीड
यंदा अतिवृष्टीमुळे तब्बल एक महिन्याच्या अवधीनंतर रबीच्या पेरण्या झाल्या होत्या. असे असताना देखील ज्वारीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने जोमात वाढ झाली असून, केवळ अडीच महिन्याच्या कालावधीत ज्वाऱ्या पोटऱ्यात आल्या आहेत.
मुबलक पावसामुळे रबी पेरणीच्या तोंडावर शेतजमिनी चिबडल्या होत्या. लांबलेल्या पेरणीमुळे उत्पादनावर परिणाम होईल की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र, दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला होता. केवळ एक महिन्याच्या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर रबीची पेरणी झाली होती. शिवाय, चांगल्या प्रतीच्या जमिनी गहू, हरभऱ्यासाठी शेतकऱ्यांनी राखीव ठेवल्या होत्या. यंदा ज्वारीची पेरणी दोन लाख हेक्टरावर झाल्या असून, रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख १० हजार २२७ एवढे आहे. पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने सर्वच पिकांची वाढ जोमाने होत आहे.
मुबलक पाणीसाठ्यामुळे पीक पद्धतीत बदल झाला असून, तब्बल पाच वर्षांनंतर गव्हाचा पेरा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक झाला आहे. चारा पिकांसाठी मक्याची मोठी लागवड झाली असून, हरभऱ्याची पेरणी सुमारे एक लाख हेक्टरवर झाली.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला असून, अत्याधुनिक साधनांचा वापर करून पेरणी केली आहे. विद्यापीठाने ठरवलेल्या नियमावलीही अवलंबल्या गेल्याचा परिणाम पिकांच्या रूपाने दिसत आहे.

Web Title: This year, in the second half of the jawar potatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.