विष्णूपुरीत येवा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:16 AM2017-08-28T00:16:47+5:302017-08-28T00:16:47+5:30

विघ्नहर्त्याचे बोट धरुन आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे़ शुक्रवारी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने शनिवारी रात्री नांदेड शहराला तब्बल चार तास झोडपून काढले़ त्यानंतर रविवारी दुपारपासून संततधार सुरुच होती़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली असून सलग दुसºया दिवशी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़

 Yehava in Vishnupurya | विष्णूपुरीत येवा सुरूच

विष्णूपुरीत येवा सुरूच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: विघ्नहर्त्याचे बोट धरुन आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे़ शुक्रवारी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने शनिवारी रात्री नांदेड शहराला तब्बल चार तास झोडपून काढले़ त्यानंतर रविवारी दुपारपासून संततधार सुरुच होती़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली असून सलग दुसºया दिवशी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़
२१ आॅगस्टच्या पहाटे नांदेड शहरासह जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती़ मृग नक्षत्रानंतर जवळपास सर्वच नक्षत्र कोरडे गेल्यामुळे तोंडचे पाणी पळालेल्या बळीराजाला मघा नक्षत्राने मोठा दिलासा दिला़ अतिवृष्टीमुळे पिकांना जीवदान मिळाले असून जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झाली होती़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी- पातळीत वाढ झाल्यामुळे सोमवारी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला होता़ त्यातून ३९६ क्युमेक्सने गोदावरी नदीत विसर्ग करण्यात आला़ सकाळी दहा वाजता हा दरवाजा बंद करण्यात आला होता़ त्यावेळी प्रकल्पात ८० दलघमी साठा उपलब्ध होता़
त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़ विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी अधूनमधून शहरासह काही भागात पावसाने हजेरी लावली होती़ त्यानंतर शुक्रवारी सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु असताना शहरात पाऊसही गणरायाच्या स्वागतासाठी आला होता़ दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरुच होती़
विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती़ त्यामुळे शनिवारी प्रकल्पात ८०़७९ दलघमी एवढा पाणीसाठा झाला होता़ त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून ४१५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ शनिवारी दिवसभर अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने रात्री साडेनऊ वाजेनंतर मात्र चांगलाच जोर धरला होता़
रात्री दीड वाजेपर्यंत पावसाने शहराला झोडपून काढले़ त्यानंतर मात्र विश्रांती घेतली़ रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती़ तासभर पडल्यानंतर दुपारी तीन वाजेपासून शहरात संततधार सुरु होती़ दुपारी चार वाजेनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़
दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागातही झालेल्या पावसामुळे रविवारी प्रकल्पात ८०़७९ दलघमी एवढा पाणीसाठा झाला होता़ प्रकल्प १०० टक्के भरल्याने दुपारी ३ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला़ त्यातून ४७१ क्यूमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ विष्णूपुरीतून गेले दोन दिवस सलग सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीचे नदीपात्र खळाळून वाहत होते़

Web Title:  Yehava in Vishnupurya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.