औरंगाबाद खंडोबा मंदिरात ‘येळकोट येळकोट’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:08 AM2017-11-25T01:08:45+5:302017-11-25T01:09:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सदानंदाचा येळकोट येळकोटच्या जयघोषात रेवड्या, बेलभंडारा उधळत हजारो भक्तांनी चंपाषष्ठीनिमित्त सातारा खंडोबा मंदिरात पहाटेपासून ...

 Yelkot Yelkot's hailstorm in Khandoba temple | औरंगाबाद खंडोबा मंदिरात ‘येळकोट येळकोट’चा जयघोष

औरंगाबाद खंडोबा मंदिरात ‘येळकोट येळकोट’चा जयघोष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सदानंदाचा येळकोट येळकोटच्या जयघोषात रेवड्या, बेलभंडारा उधळत हजारो भक्तांनी चंपाषष्ठीनिमित्त सातारा खंडोबा मंदिरात पहाटेपासून रांगा लावून दर्शन घेतले.
प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया सातारा येथील खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भक्त दरवर्षी हजेरी लावतात. मंदिर परिसरात वाघ्या- मुरळीच्या पथकातील वाघ्याचा डफ अन् तुणतुण्यावरील लयबद्धतेने खंडोबाचे गुणगान अन् हबऽऽहबऽऽ करीत मुरळीच्या गिरक्या अन् भ्ािक्तभावे तळी उचलणे व नैवेद्य अर्पण करण्यात बहुतांश भाविक कुटुंबासह हजर झाले होते. मंदिराच्या पाठीमागील मैदानात खेळाची दुकाने, आकाशपाळणे, पूजापाठ, तसेच खाऊ व संसारोपयोगी साहित्याचीही दुकाने यात्रेत होती.
पालखी मिरवणूक व पूजापाठ...
मानकरी दिलीप दांडेकर यांच्या वाड्यात पारंपरिकपणे खंडोबाची मूर्ती विराजमान झाली. येथे पूजापाठ व भंडाºयाचा कार्यक्रम सायंकाळपर्यंत संपन्न झाला. भक्तांनी मंदिरात व जहागीरदारांच्या वाड्यातही दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. यावेळी भक्त व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यात्रा यशस्वीतेसाठी ट्रस्टी तसेच ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
रक्तदान शिबीर...
मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाºया भक्तांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत रक्तपेढीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारपर्यंत २५ भक्तांनी रक्तदान केले होते. सायंकाळपर्यंत रक्तदान शिबीर सुरू होते.
वाघ्या- मुरळी मंडळाची स्पर्धा...
खंडोबा मंदिरात येणा-या वाघ्या- मुरळीला प्रोत्साहन म्हणून अशोक पाटील भवाळ यांनी वाघ्या मंडळाची स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी जवळपास ५० मंडळांनी सहभाग नोंदवून मान्यवरांचे मनोरंजन केले, तसेच या मंडळांपैकी विजय वाघ्या मुरळी मंडळाला बक्षीस देण्यात येणार आहे.

Web Title:  Yelkot Yelkot's hailstorm in Khandoba temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.