होय! मी रा. स्व. संघाचा, आधी अंबुज, नंतर मंत्री...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:00 AM2018-01-29T00:00:53+5:302018-01-29T00:03:00+5:30
‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.
ते संत एकनाथ रंगमंदिरात मातंग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचाराकडे बोट दाखवीत घणाघाती टीका केली व सल्ला दिला की, आता मातंग समाजाच्या तरुणांनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे. त्यासाठी सरकार योजना आखत असल्याचे नमूद केले.
यावेळी आ. अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक रमेश पांडव यांची भाषणे झाली. प्रा. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. उपमहापौर विजय औताडे, नगरसेविका ज्योती नाडे, डॉ. शेषराव नाडे, जालिंदर शेंडगे, नगरसेविका कीर्ती शिंदे आदींची मंचावर उपस्थिती होती. राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी ठरावांचे वाचन केले. बागडे यांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. डॉ. संजय सांभाळकर, किशनचंद तनवाणी, महेंद्र सोनवणे, मनीषा भन्साळी, अविनाश साळवे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, जगदीश वाघमारे, तुकाराम सोळसे यांना प्रदान केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बबनराव दाभाडे, राजीव खाजेकर, मच्छिंद्र कांबळे, राजूअण्णा खाजेकर, शांताबाई दणके, छाया खाजेकर, राजश्री साठे, सुनीता भालेराव, सुरेखा दणके, काकासाहेब नाडे आदींनी परिश्रम घेतले.