२ मे पासून योग दिंडीची पर्वणी
By Admin | Published: April 29, 2017 11:19 PM2017-04-29T23:19:33+5:302017-04-29T23:21:51+5:30
बीड : काकू-नाना प्रतिष्ठान, पतंजली योग समिती व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २ मे पासून योग दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड : काकू-नाना प्रतिष्ठान, पतंजली योग समिती व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २ मे पासून योग दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
२२ जून २०१६ पासून शहरात ३६५ दिवसांच्या अखंड योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर दररोज होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडत आहे. २ मे पासून योग दिंडी शहरातील विविध भागामध्ये पोहचणार असून, तेथील रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे. २१ जून रोजी जागतिक योग दिनी समारोप होणार आहे.,
उत्तम आरोग्यासाठी योग दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अॅड. श्रीराम लाखे, नितीन गोपण, आर. व्ही. वझूरकर, हेमा विभूते, विकास गवते, रत्नाकर कुलकर्णी यांनी केले. (प्रतिनिधी)