'...हजारो में हम नही मिलेंगे'; इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेऊन तरुणाची हर्सूल तलावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:06 PM2022-01-04T19:06:22+5:302022-01-04T19:07:03+5:30

मित्राला कॉल करून आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे सांगितले. 

'... you will not find me in thousands'; Young man commits suicide in Hersul Lake by posting statuses on Instagram | '...हजारो में हम नही मिलेंगे'; इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेऊन तरुणाची हर्सूल तलावात आत्महत्या

'...हजारो में हम नही मिलेंगे'; इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेऊन तरुणाची हर्सूल तलावात आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : इन्स्टाग्रामवर आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर उन हजारो में हम नहीं मिलेंगे.’ असे स्टेटस ठेवून आणि आत्महत्या करीत असल्याचा मित्राला कॉल करून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचे शव हर्सूल तलावात मंगळवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. तरुणाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा घाटी परिसरात आलेले त्याचे मित्र करीत होते. कुणाल काकासाहेब देहाडे (१९, रा. सराफा गल्ली, सिटी चौक) असे मृताचे नाव आहे. याविषयी हर्सूल पोलिसांनी सांगितले की, कुणाल हा वडिलांसोबत रंगकामाचा (पेंटर) ठेका घेत असे. ३१ डिसेंबर रोजी त्याने सकाळी दुचाकीवर वडिलांना चिकलठाणा एमआयडीसीतील एका संस्थेत सुरू असलेल्या कामावर नेऊन सोडले. यानंतर तो दुचाकी घेऊन तेथून बाहेर पडला. एका मित्राला फोन करून तो आत्महत्या करणार असल्याचे म्हणाला. नंतर त्याने फोन बंद केला. नंतर त्याने हर्सूल तलाव गाठला. तेथून पुन्हा मित्राला कॉल करून आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे त्याने सांगितले. 

आदल्या दिवशी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट ठेवली होती. यात त्याने म्हटले होते की, ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर उन हजारो में हम नहीं मिलेंगे.’ ही पोस्ट वाचून मित्राने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक आणि मित्र त्याचा शोध घेत होते. तो हरवल्याची तक्रार सिटी चौक ठाण्यात नोंदविण्यात आली होती. तलावाजवळ त्याची मोटारसायकल आढळून आली होती. यामुळे अग्निशामक दलाचे जवान चार दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र यात यश आले नव्हते. आज सकाळी कुणालचे प्रेत तरंगताना दिसले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ते काढले, तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. याविषयी हर्सूल ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: '... you will not find me in thousands'; Young man commits suicide in Hersul Lake by posting statuses on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.