पिकास पाणी देण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 06:55 PM2022-01-06T18:55:45+5:302022-01-06T18:59:24+5:30

रात्रीच्या वेळी वीज असल्याने बहुतेक शेतकरी शेतात रात्रीच पाणी देण्यासाठी जातात

A young farmer who went to irrigate his crop fell into a well and died | पिकास पाणी देण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

पिकास पाणी देण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

googlenewsNext

वैजापूर : पिकास पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बेलगाव शिवारात बुधवारी रात्री घडली. अनिल ज्ञानेश्वर औताडे (३०, रा.भग्गाव ) असे या घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

रात्रीची विज असल्याने अनिल औताडे हे बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या बेलगाव शिवारातील गट नंबर १५८ मधील शेतात असलेल्या मका पिकास पाणी देण्यासाठी घरून गेले होते. ते सकाळी घरी न आल्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद होता. त्यामुळे नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. तेव्हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतातील विहीरीत अनिलचा मृतदेह आढळून आला. 

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाचे वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी सुनिल ज्ञानेश्वर औताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी असा परिवार आहे.खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष साहेबराव औताडे यांचे ते नातू होते.

Web Title: A young farmer who went to irrigate his crop fell into a well and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.