जिवे मारण्याची धमकी देऊन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:13 AM2019-01-04T00:13:19+5:302019-01-04T00:13:47+5:30
ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले.
औरंगाबाद : ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले.
हनुमान भास्कर वीर (रा. हनुमाननगर, सिडको एन-३)असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, आरोपी हनुमान हा एका शिक्षणसंस्थेतील पदविका अभ्यासक्रमाचा बहिस्थ विद्यार्थी आहे. पीडितेच्या कॉलनीमध्ये हनुमानचे मित्र राहतात. मित्रांना भेटण्यासाठी हनुमान हा सतत त्यांच्या घरी जात असे. पीडितेसोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मे महिन्यात तो पीडितेला घेऊन हनुमाननगर येथील त्याच्या खोलीवर आला. तेथे त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन प्रथम अत्याचार केला. त्यानंतर तो तिच्यावर सतत अत्याचार करू लागला. पीडिता गरोदर असल्याचे समजल्यानंतर त्याने तिला पुन्हा धमकावून बळजबरीने तिचा गर्भपात घडवून आणला. पीडितेने गर्भपात करावा, यासाठी त्याने तिला शिवीगाळ करून मारहाणही केली होती. तो सतत तिला जिवे मारण्याची धमकी देई. त्याच्याकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच असल्याने पीडितेने नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक पीडितेला सोबत घेऊन थेट पुंडलिकनगर ठाण्यात दाखल झाले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून हनुमानला अटक केली.
चौकट
७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
आरोपी हनुमान याच्याविरुद्ध बुधवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. कापसे आणि कर्मचाºयांनी झटपट कारवाई करून हनुमानला त्याच्या खोलीतून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.