टँकरच्या धडकेत चिमुरडीसह जवान ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:43 AM2017-12-02T00:43:15+5:302017-12-02T00:43:20+5:30
आजीसासूच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जाणा-या भारत बटालियनच्या जवानासह त्याच्या मेहुणीच्या १३ महिन्यांच्या चिमुकलीला भरधाव टँकरने चिरडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आजीसासूच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जाणाºया भारत बटालियनच्या जवानासह त्याच्या मेहुणीच्या १३ महिन्यांच्या चिमुकलीला भरधाव टँकरने चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार महिला किरकोळ जखमी झाली. हा भीषण अपघात १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास केंब्रिज शाळेच्या चौकात झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी टँकरचालकास अटक केली.
भारत बटालियनचा जवान किशोर दादासाहेब थोटे (२७, ह.मु. भारत बटालियन, सातारा परिसर, मूळ रा.थेरगाव, ता. पैठण), गायत्री राजू दहीहंडे (१३ महिने, रा.चिकलठाणा)असे ठार झालेल्यांची नावे आहेत. रोहिणी दहीहंडे (२५, रा.चिकलठाणा) या घटनेत जखमी झाल्या.
याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, किशोर थोटे यांच्या आजीसासूचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची राख सावडण्याचा कार्यक्रम दि.१ रोजी सकाळी आडगाव ठोंबरे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी किशोर, त्यांची मेहुणी रोहिणी दहीहंडे आणि चिमुकली गायत्री हे मोटारसायकलने (एमएच-२० बीडब्ल्यू ७१२८) आडगाव ठोंबरे येथे सकाळी चिकलठाणा येथून निघाले. केंब्रिज चौकात ते असतानाच झाल्टा फाट्याकडून सुसाट आलेल्या पेट्रोलच्या टँकरने (एमएच-०४बीयू७०२१) दुचाकीला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक (पान ५ वर)
टँकरचालकास अटक
या अपघातानंतर पोलिसांनी टँकरचालक नीलेश साहेबराव वडगर (३२, रा. नांदूर, जि. नाशिक) याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. तो मनमाड येथून पेट्रोल-डिझेलचे टँकर घेऊन हिंगोली जिल्ह्यातील हत्ता येथे जात होता.
अपघाताचा चौक
केंब्रिज शाळा चौकाजवळ सतत लहान-मोठे अपघात घडतात. झाल्टा फाट्याकडून येणारी वाहने रेल्वे ओव्हर ब्रीजवरून उतारामुळे वेगात येतात. उतारावरून येणारी वाहने सुसाट जालना रोडवरील केंब्रिज शाळा चौकात येतात. त्याचवेळी जालन्याकडून औरंगाबादकडे आणि औरंगाबादकडून जालन्याकडे किंवा झाल्टा फाटा, हर्सूल रिंग रोडकडे वळण घेणाºया वाहनांची संख्या अधिक असते. कोणते वाहन कोणत्या दिशेने वळण घेते हे झाल्टा फाट्याकडून येणाºया वाहनचालकाच्या लवकर लक्षात येत नाही आणि तिकडून येणाºया वाहनांमुळे अपघात घडतात. या चौकाजवळ चार महिन्यांपूर्वी एका सुसाट जीपचालकाने चार पादचाºयांना चिरडले होते. त्या वाहनाचा चालक अद्यापही मोकाट आहे.
शोकसलामी देऊन अंत्यसंस्कार
किशोर थोटे हे २०१४ साली भारत बटालियनमध्ये भरती झाले. वर्षभर खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न झाले. त्यांना सव्वा वर्षाची मुलगी आहे. या घटनेची माहिती मिळताच भारत बटालियनचे उपाधीक्षक बी.एस. पवार, निरीक्षक आर.ए. राऊत, अशोक साळवे आणि अन्य जवानांनी, तसेच त्यांच्या गावाकडील नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली.
४अत्यंत मनमिळावू स्वभावाचा हा जवान होता, अशी माहिती त्यांच्या सहका-यांनी दिली. नातेवाईकाच्या राख सावडण्यासाठी जायचे असल्याने किशोर यांनी एक दिवसाची किरकोळ रजा घेतली होती.
४घाटीत त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत भारत बटालियन येथे नेण्यात आले. तेथे त्यांना शोक सलामी देण्यात आली. यानंतर शासकीय इतमामात थेरगाव या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.