प्रेयसीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाने अपार्टमेंटवरून उडी मारून संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:03 AM2021-06-25T04:03:27+5:302021-06-25T04:03:27+5:30

औरंगाबाद : विवाहित प्रेयसीने भेटण्यास तसेच त्याच्यासोबत घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने प्रियकराने आरडाओरड करीत अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारून आत्महत्या ...

The young man jumped out of the apartment and ended his life after his girlfriend refused to meet him | प्रेयसीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाने अपार्टमेंटवरून उडी मारून संपविले जीवन

प्रेयसीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाने अपार्टमेंटवरून उडी मारून संपविले जीवन

googlenewsNext

औरंगाबाद : विवाहित प्रेयसीने भेटण्यास तसेच त्याच्यासोबत घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने प्रियकराने आरडाओरड करीत अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ईटखेडा येेथे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तुषार संजय गायकवाड (३२, रा. शिवाजीनगर, ठाणे ) असे मृताचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तुषार हा मुंबई महापालिकेत नोकरी करीत होता. ठाणे शहरातील एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. तिच्या घरातील मंडळींना त्यांचे प्रेम मान्य नसल्याने त्यांनी दुसऱ्या तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर तरुणीला दोन अपत्ये झाली. ती पतीसोबत ईटखेडा परिसरात राहते. मात्र, तुषारचे तिच्यावर प्रेम असल्याने त्याने लग्न केले नव्हते. तो तिला भेटण्यासाठी अधुनमधून औरंगाबादेत यायचा. काल गुरुवारीही तो येथे आला आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. तू माझ्यासोबत चल, असे तो तिला म्हणत होता. पण पती घरी असल्याने तिने त्यास भेटण्यास नकार दिला. शिवाय येथून निघून जा, असे ती वारंवार त्यास सांगत होती. याचा राग आल्याने तो तिच्या अपार्टमेंटमध्ये गेला. तेथे त्याने आरडाओरड करून तिला पुन्हा घराबाहेर येण्यास सांगितले. त्यानंतरही तिने नकार देताच, तुषार अपार्टमेंटच्या छतावर गेला आणि त्याने तेथून थेट खाली उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला.

या घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तुषारला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. पण अपघात विभागातील डॉक्टरांनी तुषारला तपासून रात्री १०.५० वाजता मृत घोषित केले. पोलीस हवालदार युवराज हिवराळे या घटनेचा तपास करीत आहेत.

---------------

चौकट

मृतदेह दिवसभर घाटीतील शवागृहात

डॉक्टरांनी तुषारला तपासून मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह घाटीतील शवागृहात ठेवला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून या घटनेची माहिती कळविली. त्याचे नातेवाईक ठाणे येथून निघाले असून गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी घाटीत ते पोहोचले नव्हते. त्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदनपूर्व पंचनामा केला जाईल. त्यानंतर शवविच्छेदन झाल्यावर तुषारच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, असे सातारा पोलिसांनी सांगितले.

Web Title: The young man jumped out of the apartment and ended his life after his girlfriend refused to meet him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.