बैल धुण्यासाठी तलावात गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 PM2021-08-13T16:46:20+5:302021-08-13T16:46:48+5:30
नातेवाईकांनी लागलीच तलावावर धाव घेत अभिषेकला अत्यवस्थ अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
खुलताबाद : बैल धुण्यासाठी पाझर तलावावर गेलेल्या एका २० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११:३० वाजता तालुक्यातील मावसाळा येथे घडली. अभिषेक संजय श्रीखंडे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मावसाळा येथील अभिषेक संजय श्रीखंडे हा आज शुक्रवारी सकाळी बैल धुण्यासाठी पाझर तलावावर गेला होता. बैल धुत असतांना तो पाण्यात बुडला. सोबत असलेल्या एका मुलाने ही घटना गावात सांगितली. नातेवाईकांनी लागलीच तलावावर धाव घेत अभिषेकला अत्यवस्थ अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
अभिषेक पदवीचे शिक्षण घेत होता. त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. यासाठी तो सराव करीत होता. दरम्यान खुलताबाद ग्रामीण रूग्णायात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार मावसाळा येथे करण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.