दुचाकी अपघातात तरुण छायाचित्रकार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:04 AM2021-02-16T04:04:56+5:302021-02-16T04:04:56+5:30

पिशोर : पिशोर-सिल्लोड रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एका तरुण छायाचित्रकाराचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना ...

Young photographer killed in two-wheeler accident | दुचाकी अपघातात तरुण छायाचित्रकार ठार

दुचाकी अपघातात तरुण छायाचित्रकार ठार

googlenewsNext

पिशोर : पिशोर-सिल्लोड रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एका तरुण छायाचित्रकाराचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ज्ञानेश्वर सुदाम काथार (४२, रा. नादरपूर. ता. कन्नड) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, छायाचित्रकार ज्ञानेश्वर काथार हे दुचाकी (क्र. एमएच २० डी. पी. ८८४८) वरून पिशोर-सिल्लोड रस्त्यावरून नादरपूरकडे जात होते. तेव्हा शेवरीनाल्याजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन रक्तबंबाळ व बेशुद्धावस्थेत आढळून आले. येथून जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी पिशोर पोलीस ठाण्याला तात्काळ माहिती दिली. माहिती मिळताच सहायक फौजदार माधव जरारे व संजय राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता. पोलिसांनी तात्काळ पिशोर ग्रामीण रुग्णालयात जखमीला दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर जारवाल यांनी तपासणी करून जखमी अवस्थेत असलेले ज्ञानेश्वर काथार यांना मृत घोषित केले. सोमवारी सकाळी नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. संजय राजभोज यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नादरपूर येथील स्मशानभूमित ज्ञानेश्वर काथार यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, चार मुली असा परिवार आहे. पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली़. स.पो.नि. बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार माधव जरारे पुढील तपास करीत आहेत.

150221\patel mubeen abdul gafoor_img-20210215-wa0004_1.jpg

दुचाकी अपघातात तरुण छायाचित्रकार ठार

Web Title: Young photographer killed in two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.