मतदानाचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकणारा तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:09 AM2019-04-27T00:09:51+5:302019-04-27T00:10:27+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यास गुन्हे शाखेने आज शुक्रवारी (दि.२६) अटक केली.

Young voter in voting of voting video | मतदानाचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकणारा तरुण अटकेत

मतदानाचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकणारा तरुण अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यास गुन्हे शाखेने आज शुक्रवारी (दि.२६) अटक केली.
शेख इब्राहिम शेख करीम, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, २३ मार्च रोजी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. तेव्हा एका मतदान केंद्रावर मतदान करणाºया अनोळखी व्यक्तीने एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत असल्याचा व्हिडिओ मोबाईलवर तयार केला. हा व्हिडिओ टिकटॉक या सोशल मीडियावर अपलोड करून तो व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबतची तक्रार नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर यांनी २३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या तक्रारीनुसार सायबर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. राहुल खटावकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, कर्मचारी मनोज चौहान, भगवान शिलोटे, दत्ता ढंगारे, संतोष सूर्यवंशी, संजय खोसरे, महिला कर्मचारी तेलुरे यांच्या पथकाने तपास करून आरोपी शेख इब्राहिम याला अटक केली. इब्राहिम या कॅनॉट प्लेसमधील एका मोबाईल शॉपीवर काम करतो.

Web Title: Young voter in voting of voting video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.