धावत्या रिक्षात विद्यार्थिनीची छेड, प्रसंगावधान राखत महिला वकील आली धावून, नागरिकांनी आरोपींना दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 05:23 PM2021-12-09T17:23:49+5:302021-12-09T17:24:44+5:30

रिक्षात बसल्यानंतर एका प्रवाशाने काही अंतर गेल्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

Young woman molested in a speeding rickshaw on Jalana road | धावत्या रिक्षात विद्यार्थिनीची छेड, प्रसंगावधान राखत महिला वकील आली धावून, नागरिकांनी आरोपींना दिला चोप

धावत्या रिक्षात विद्यार्थिनीची छेड, प्रसंगावधान राखत महिला वकील आली धावून, नागरिकांनी आरोपींना दिला चोप

googlenewsNext

औरंगाबाद : बाबा पेट्रोल पंप येथून एमजीएम शिक्षण संस्थेकडे येत असलेल्या एका विद्यार्थिनीची रिक्षात बसल्यानंतर छेड काढण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी रिक्षाचालकास चोप देत पोलीस ठाण्यात पकडून आणले. दुसरा आरोपी पळून गेला. मध्यरात्री उशिरापर्यंत क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

क्रांती चौक ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, एमजीएम संस्थेत शिक्षण घेत असलेली एक विद्यार्थिनी बाबा पेट्रोल पंप येथून रिक्षात (एमएच २० ईएफ ९००६) सेव्हन हिल येथे जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा गयास अस्लम बागवान (वय ३०, रा. गारखेडा परिसर) याच्या रिक्षात बसल्यानंतर एका प्रवाशाने काही अंतर गेल्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने त्याच्या थोबाडीत मारली. त्याचवेळी चालकही छेड काढणाऱ्याची साथ देऊ लागला. त्यामुळे मुलीने आरडाओरड करीत रिक्षा थांबवली. त्याचवेळी जवळून जात असलेल्या एका वकील महिलेने दुचाकी थांबवत विद्यार्थिनीस मदत केली. त्याचवेळी रिक्षाचालकाच्या थोबाडीतही दिली. यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. तेव्हा दोघांपैकी एक जण पळून गेला. एकास नागरिकांनी मारहाण करीत पकडून नंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

माहिती देण्यास टोलवाटोलवी
नागरिकांनी पकडून रिक्षाचालकास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीच्या पत्नीनेही ठाण्यात येत तक्रार देणाऱ्या विद्यार्थिनीस दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तरीही विद्यार्थिनी तक्रार देण्यावर ठाम राहिली. या घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. याविषयी निरीक्षक गणपत दराडे यांना विचारले असता त्यांनी आपण दवाखान्यात असल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात रात्री १० वाजेच्या सुमारास एकही उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी उपस्थित नसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.

Web Title: Young woman molested in a speeding rickshaw on Jalana road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.