वाळूजची तरुणी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:02 AM2020-12-31T04:02:56+5:302020-12-31T04:02:56+5:30
फोटो क्रमांक- पृथ्वी सोनवणे (बेपत्ता) --------------------- दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ वाळूज महानगर : चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन ...
फोटो क्रमांक- पृथ्वी सोनवणे (बेपत्ता)
---------------------
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
वाळूज महानगर : चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून पत्नीचा छळ करणाऱ्या पतीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुप्रिया सुविध भळगट (वय २९, रा. ओएसिस चौक, बजाजनगर) या विवाहितेस पती सुविध हा चारचाकी खरेदीसाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत छळ करत होता. छळाला कंटाळून सुप्रियाने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली.
--------------------------
तिरंगा चौकात निवारा शेड उभारा
वाळूज महानगर : पंढरपुरातील तिरंगा चौकातील बसथांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. उद्योगनगरीतुन गंगापूर व नगरकडे जाणारे प्रवासी या बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करीत असतात. मात्र, निवारा शेड नसल्यामुळे ज्येष्ठ महिला, नागरिक व लहान मुलांना उन्हातच उभे राहावे लागते. या बसथांब्यावर निवारा शेड उभारण्याची मागणी सुयोग कापसे, रामकृष्ण भिंगारे, अनिकेत कुलकर्णी, आदी प्रवाशांनी केली आहे.
---------------------
जोगेश्वरीत उघड्यावर मांस विक्री
वाळूज महानगर : जोगेश्वरी परिसरात उघड्यारच मांस विक्री होत आहे. रांजणगाव रोड, सिएट रोड, आदींसह नागरी वसाहतीत मांस विक्री सुरू आहे. बहुतांश विक्रते टाकाऊ पदार्थ उघड्यावर टाकत असल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा रस्त्यावर सतत वावर असतो. यामुळे अस्वच्छता पसरत असल्याची ओरड नागरिकांतुन होत आहे.
--------------------------
वडगावात आरोग्यविषयी जनजागृती
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थ बुद्ध विहार परिसरात आरोग्याविषयी जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात तज्ज्ञांनी नागरिकांना मार्गदर्शन करून आरोग्याविषयी जनजागृती केली. संविधान बचाव संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद वराडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला ए. बी. बनकर, सतीश बनकर, संतोष पवार, सीताराम गायकवाड, राजू भालेराव, ताराबाई बनकर, माया साळवे, मीना पवार, आदींची उपस्थिती होती.
------------------- ------------