यंग इलेव्हन विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:58 AM2017-11-28T00:58:44+5:302017-11-28T00:59:34+5:30
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन ब संघाने अश्वमेध कुकाना संघावर १0 गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपर किंग संघाने अलॉफ्ट लायमर संघावर ६३ धावांनी विजय मिळवला.
औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन ब संघाने अश्वमेध कुकाना संघावर १0 गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपर किंग संघाने अलॉफ्ट लायमर संघावर ६३ धावांनी विजय मिळवला.
पहिल्या सामन्यात यंग इलेव्हन ब संघाने अश्वमेध संघाला २0 षटकांत ९ बाद ९९ धावांवर रोखले. अश्वमेध संघाकडून ज्ञानेश्वर देशमुखने २ चौकारांसह ३६ व अभिजित काळे व मनोज कुमार यांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. यंग इलेव्हन संघाकडून शुभम मोहितेने ३, तर विकास नगरकर व अतुल वालेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यंग इलेव्हनने एकही गडी न गमावता विजयी टार्गेट पूर्ण केले. त्यांच्याकडून उदय पांडेने २ षटकार व ६ चौकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. संदीप गायकवाडने ५ चौकारांसह २९ धावांची खेळी करीत त्याला साथ दिली.
दुपारच्या सत्रात कन्नड सुपर किंग संघाने अलॉफ्ट लायमर संघाविरुद्ध २0 षटकांत ८ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून स्वप्नील साळवीने ३६ व शशी कदम याने नाबाद २३ धावा केल्या. अलॉफ्ट लायमर संघाकडून अतिक नाईकवाडेने ३, तर मोहंमद इम्रानने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात अलॉफ्ट लायमर संघ १६ षटकांत ६६ धावांत सर्वबाद झाला. कन्नड सुपर किंगकडून शशी कदमने २४ धावांत ४ गडी बाद केले. अमोल खरातने २ गडी बाद केले. आज झालेल्या सामन्यात गंगाधर शेवाळे व आर. नेहरी यांनी पंचांची भूमिका पार पाडली. गुणलेखन राजेश भिंगारे व सचिन पाटील यांनी केले.
उद्या सकाळी सव्वाआठ वाजता लिप फास्टनर विरुद्ध नेरळकर अकॅडमी आणि दुपारी १ वाजता अश्वमेध बुकाना विरुद्ध इकबाल सिद्दीकी फॅन क्लब यांच्यात लढत रंगणार आहे.