लग्नाळूंनी केली हद्द पार, महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून ठेवले स्टेटसवर, दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 02:27 PM2022-01-12T14:27:46+5:302022-01-12T14:28:55+5:30

या दोघांमुळे आपला विनयभंग आणि बदनामी झाल्याची तक्रार

The youngsters crossed the line, put the photo of the woman as their future wife on the social media status, two arrested | लग्नाळूंनी केली हद्द पार, महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून ठेवले स्टेटसवर, दोघे अटकेत

लग्नाळूंनी केली हद्द पार, महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून ठेवले स्टेटसवर, दोघे अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद : ओळखीच्या विवाहित महिलेची छायाचित्रे आपली भावी पत्नी म्हणून स्वतः च्या व्हॉट्सॲपवर आणि इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या दोन लग्नाळू तरुणांना सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

प्रवीण मदन तुपे (२७, रा. मिसारवाडी) आणि सुमित धीरज मोरे (१९, रा. पृथ्वी पार्क, पडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सायबर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार विवाहितेचे पतीसोबत पटत नसल्याने ती तिच्या लहान बाळासह शहरात राहते. वाहनचालक आरोपी तुपेसोबत तिची गतवर्षी ओळख झाली होती. यातून पुढे काही दिवसांनी त्यांची मैत्री झाली. तुपेने तिला लग्नाची मागणी घातली. तिने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला.

एवढेच नव्हे तर मोरे यानेही तुपेप्रमाणेच तिची छायाचित्रे स्वतः च्या इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सॲप स्टेटसवर अपलोड करून तिला भावी पत्नी असे संबोधित करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे तिची समाजात बदनामी होऊ लागली. या दोघांमुळे आपला विनयभंग आणि बदनामी झाल्याची तक्रार तिने २७ डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलीस निरीक्षक गौतम पातारे, कर्मचारी गोकूळ कुतरवाडे, राम कवडे आणि अमोल सोनटक्के यांच्या पथकाने तपास करून आरोपीविरुद्ध पुरावे गोळा केले आणि मंगळवारी त्यांना अटक केली.

Web Title: The youngsters crossed the line, put the photo of the woman as their future wife on the social media status, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.