‘तुमचे आयुष्य कधीही बदलू शकते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:57 AM2017-10-16T00:57:32+5:302017-10-16T00:57:32+5:30

आपले आयुष्य कधीही बदलू शकते यावर माझा विश्वास आहे, असे प्रांजळ मत भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी व्यक्त केले.

 'Your Life Can Changed' | ‘तुमचे आयुष्य कधीही बदलू शकते’

‘तुमचे आयुष्य कधीही बदलू शकते’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खेळाप्रती असलेली माझी श्रद्धा, समर्पण, अपार मेहनत करण्याची जिद्द आणि देशावरील निस्सीम प्रेम या चतु:सूत्रीच्या बळावरच मी यशस्वी झालो आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, मी देशासाठी हॉकी खेळेन, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारेन. आपले आयुष्य कधीही बदलू शकते यावर माझा विश्वास आहे, असे प्रांजळ मत भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी व्यक्त केले.
उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकरलिखित ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स’ या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते रविवारी (दि.१५) तापडिया नाट्यमंदिरात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक ऋषिकुमार बागला, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, बाबा भांड आणि अंजली धानोरकर यांची उपस्थिती होती.
क्रीडा, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत सॉफ्ट स्किल्सची गरज असते. येथून पुढे तर कौशल्य अवगत केल्यावाचून पर्याय नाही. यशस्वी खेळाडू होण्याकरिता ही सॉफ्ट स्किल्स माझ्या उपयोगी आली, असे पिल्ले म्हणाले.
धानोरकर यांनी पुस्तक लिखाणामागची भूमिका व निर्मितीप्रक्रिया याविषयी वर्णन केले. ‘आयुष्यात येणाºया प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सॉफ्ट स्किल्स फार कामी येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून अधिकाºयांपर्यंत कोणीच अपवाद नाही. यशामध्ये १५ टक्के हार्ड स्किल्स आणि ८५ सॉफ्ट स्किल्सचा वाटा असतो.
देशमुख यांनी त्यांचा वाचन प्रवास उलगडताना सांगितले की, ‘वाचनातून चांगला लेखक होता येते. बालपणी वाचलेले साहित्य मनावर संस्कार रुजवतात. वाचल्यामुळे नवे जग कळते, अनुभवविश्व विस्तारते. मला वाचनाने काय दिले, तर मला समृद्ध केले असेच मी म्हणेन.’
बागला यांनी रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी सॉफ्ट स्किल्स अत्यावश्यक असल्याचे सांगितले. ‘कौशल्य अवगत करण्याची सुरुवात आईच्या पोटात असल्यापासूनच होते. कौशल्यविकासाच्या पुस्तकांतून एक दिशा मिळते. ते कौशल्य अंगीकारणे महत्त्वाचे,’ असे ते म्हणाले.
कार्यक्रमात अंजली धानोरकर यांनी अभिवाचन केलेल्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या दृक्श्राव्य डीव्हीडीचेही विमोचन करण्यात आले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संगीता दाभाडे यांनी आभार मानले.

Web Title:  'Your Life Can Changed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.