तुरीचा प्रश्न अजूनही रेंगाळलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:28 AM2017-08-22T00:28:42+5:302017-08-22T00:28:42+5:30

जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केलेल्या तुरीच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र ही तूर खरेदी अजूनही सुरू झाली नाही. मध्यंतरी भाववाढ झाल्याने शेतकºयांनी तूर बाजारात आणली होती. आता यातील किती शिल्लक असेल, हा प्रश्नच आहे.

Your question is still linger | तुरीचा प्रश्न अजूनही रेंगाळलेलाच

तुरीचा प्रश्न अजूनही रेंगाळलेलाच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केलेल्या तुरीच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र ही तूर खरेदी अजूनही सुरू झाली नाही. मध्यंतरी भाववाढ झाल्याने शेतकºयांनी तूर बाजारात आणली होती. आता यातील किती शिल्लक असेल, हा प्रश्नच आहे.
शासनाच्या हमी भाव केंद्रावर तूर आणल्यानंतर शेतकºयांना मागील पूर्ण हंगामात वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. अनेक दिवस माल यार्डात पडून राहिला. त्यातच शासनाने ठराविक काळातच खरेदी केली. नंतर पुन्हा मुदतवाढीचा खेळ अनेक दिवस चालला. ३१ मेपर्यंत टोकन असलेल्या शेतकºयांची तूर ३१ जुलैपर्यंत खरेदी केली. मात्र नोंदणी केलेल्या मात्र टोकन न दिलेल्या शेतकºयांना या निर्णयाची अडचण झाली. त्यामुळे अशांची तूर घरातच पडून राहिली. त्यानंतर उर्वरित तुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतचा प्रस्तावही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शासनाकडे पाठवून खरेदीसाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांनी कृषी व पणन विभागाशी संपर्क साधल्यानंतर या सर्व शेतकºयांची तूर खरेदी होणार असल्याचे सांगितले होते. शेतकºयांनी खाजगी बाजारात तूर विकू नये, असे आवाहनही केले होते. मात्र मध्यंतरी पाच हजारांपर्यंत खाजगी व्यापारीच तूर खरेदी करू लागले होते. त्यामुळे अनेकांनी यात तुरीची विक्री केली. आता खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या काहीच हालचाली दिसत नाहीत. जे शेतकरी खरेच शासनाचे खरेदी केंद्र सुरू होईल, या आशेवर बसले आहेत त्यांची अडचण होवून बसली आहे. जिल्हाधिकाºयांनीच या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज असून जिल्हा उपनिबंधक कार्यालय अथवा बाजार समितीकडे याची माहितीच नाही.

Web Title: Your question is still linger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.