निवडणूक फडात उतरण्यासाठी तरुणाई उत्सुक...
By Admin | Published: July 16, 2016 12:57 AM2016-07-16T00:57:20+5:302016-07-16T01:10:41+5:30
उस्मानाबाद : नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असला तरी नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने केलेल्या
उस्मानाबाद : नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असला तरी नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे मत ८१ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे़ विशेष म्हणजे निवडणूकीच्या रिंगणात उतरु पाहणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक असल्याचे ६३ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे़ यंदाच्या निवडणूक आखाड्यात उतरण्याचा निर्णय अनेक युवकांनी घेतल्याने ज्येष्ठांचीही मोठी गोची होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे़
प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाल्यापासून आता सर्वच शहरांमधील निवडणुकांचा आखाडा पेटू लागला आहे़ आरक्षणानंतर सोयीस्कर प्रभागांची चाचपणी इच्छुकांकडून करण्यात येत आहे़ निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या कशी आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यात इच्छुकांची संख्या वाढल्याचे मत ८१ टक्के नागरिकांनी नोंदविले तर १९ टक्के नागरिकांच्या मते इच्छुकांची संख्या घटली आहे़ निवडणूक म्हटले की, ज्येष्ठांसह आजी-माजी पदाधिकारी, युवकांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात येते़ शिवाय अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरून अनेकजण नशिब आजमावतात़ या अनुषंगाने इच्छुकांमध्ये प्रामुख्याने कोणता वर्ग दिसतो ? हा प्रश्न विचारण्यात आला होता़ यावर इच्छुकांमध्ये युवकांची संख्या अधिक असल्याचे मत ५३ टक्के नागरिकांनी नोंदविले़ तर ज्येष्ठांची संख्या अधिक असल्याचे २५ टक्के नागरिकांचे म्हणणे असून, महिलांची अधिक संख्या असल्याचे मत २२ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे़ निवडणूक लढविणारे कोण असतील ? याचा नेम नसतो दहावी नापास असलेल्यांपासून पदवी घेतलेलेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात़ या अनुषंगाने उच्चशिक्षित युवक निवडणुकीसाठी इच्छूक दिसतात का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यात ४३ टक्के नागरिकांच्या मते उच्चशिक्षित तरूण निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छूक नाहीत़ तर ३८ टक्के नागरिकांच्या मते उच्चशिक्षित युवकांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे़ तर १९ टक्के नागरिकांनी याबाबत काहीही मत नोंदविले नाही. (प्रतिनिधी)