‘तू गावात दादागिरी करतोस काय’ असे म्हणत तीन जणांनी केला युवकावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:04 AM2021-06-03T04:04:22+5:302021-06-03T04:04:22+5:30
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा काळे हा रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शिवना गावाकडे जात होता. तेव्हा पांढऱ्या रंगाची ...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा काळे हा रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शिवना गावाकडे जात होता. तेव्हा पांढऱ्या रंगाची कार समोरून आली. आम्हाला भोकरदनकडे जायचे आहे. भोकरदन रस्ता कुठे आहे आणि कसा आहे, अशी विचारणा त्यांनी कृष्णाला केली. तेव्हा कृष्णा याने पुढाकार घेत त्यांना भोकरदन रस्ता दाखविला. त्यांना रस्त्याबद्दल माहिती देऊन तो शिवनाकडे निघाला. तेव्हा अचानक कारमधील तिघेजण खाली उतरून त्याच्याकडे आले. त्यांनी धारदार शस्त्राने वार करण्यास सुरूवात केली. तू गावात दादागिरी करतोस काय, थांब तुझा काटाच काढतो, अशी धमकी देत व शिवीगाळ करून त्या अज्ञात हल्लेखोरांनी कृष्णाला जखमी केले. काही क्षणातच त्यांनी कारमध्ये बसून घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना शिवना गावापासून काही अंतरावर झाल्याने आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कृष्णा काळे याला उपचारासाठी अंजिठा रुग्णालयात नेण्यात आले. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बीट जमादार नीलेश सिरस्कर, कौतीक चव्हाण हे करीत आहेत.
---
आरडाओरड झाल्याने वाचला जीव
कृष्णा काळे याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला सुरू झाला. काही कळण्याच्या आत धमकी व शिवीगाळ केली जाऊ लागली. तेव्हा कृष्णावर वार होताच त्याने आरडाओरड सुरू केली. शिवना गावापासून काही अंतरावरच ही घटना घडत होती. रात्री नऊ वाजण्याची वेळ असल्याने गावालगत फिरण्यास गेलेल्या नागरिकांनी हा ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी धावाधाव सुरू केल्याने कृष्णाचा जीव वाचला. गावात दादागिरी करतो, अशी धमकी देत मारहाण झाल्याने मारहाणीत गावातील कोणाचा तरी हात असू शकतो, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
फोटो :
020621\img-20210602-wa0144_1.jpg
चाकूने झाला हल्ला