कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:02 AM2021-04-23T04:02:16+5:302021-04-23T04:02:16+5:30

युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हेल्पलाइनची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची नावे व मोबाइल ...

Youth Congress helpline to help corona patients | कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

googlenewsNext

युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हेल्पलाइनची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची नावे व मोबाइल नंबर्स हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले गेले आहेत. त्यानुसार प्रत्येक कॉलवर पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत व ज्यांना जशी गरज आहे, त्या पद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करत आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शन, रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, दवाखान्यांनी दिलेली अतिरिक्त बिल कमी करणे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून देणे या कार्यात युवक काँग्रेसचे पदाधिकारी राबत आहेत.

जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली येथून दररोज प्रत्येक पदाधिकाऱ्यांना १५० ते २०० फोन कॉल येतात. त्याची दखल हे पदाधिकारी घेत आहेत.

१९ एप्रिल रोजी रोजी रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला व शासकीय यंत्रणेच्या विलंबामुळे दवाखान्यांना हे इंजेक्शन्स मिळाले नव्हते. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय व जिल्हा प्रशासन यात मध्यस्थी करून ४ ते ५ रुग्णालयांना २५० ते ३०० इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले.

हेल्पलाइनचे प्रमुख डॉ. नीलेश अंबेवाडीकर, युवक काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष मोहसीन खान, शहर महासचिव मोहसीन, विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादूरे, शहर सचिव आकाश रगडे आदी पदाधिकारी ही जबाबदारी पार पाडत आहेत.

Web Title: Youth Congress helpline to help corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.