अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:20 PM2018-10-26T22:20:07+5:302018-10-26T22:20:45+5:30
करमाड : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रात्रीची ड्यूटी करून घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शेंद्रा एमआयडीसीतील बीएसएनएल टॉवरजवळ गुरुवारी रात्री १०.३० वाजता घडली. अमोल उत्तमराव शिंदे (१९), असे मृताचे नाव आहे, तर जखमीमध्ये दिलीप अर्जुन घोडके (२०, रा. दोघेही मंगरूळ, ता. औरंगाबाद) याचा समावेश.

अमोल शिंदे व दिलीप घोडके हे शेंद्रा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला असून, गुरुवारी रात्री ड्यूटी संपवून दोघे दुचाकीवरून (एमएच-२० एयू-१९२१) करमाडमार्गे मंगरूळकडे जात होते. शेंद्रा एमआयडीसीतील बीएसएनएल टॉवरजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अमोल शिंदे व घोडके गंभीर जखमी झाले. यावेळी पाठीमागून येणाºया त्यांच्या मित्रांनी घाटी दवाखान्यात दाखल केले.
तेथे अमोल शिंदे याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमोल याच्या पश्चात आई, वडील व भाऊ, असा परिवार आहे. कर्ता तरुण अपघातात ठार झाल्याने मंगरूळ गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवींद्र साळवे करीत आहेत.
दरम्यान, अवैध गौण खनिज चोरी करणाºया हायवामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर म्हणाले की, हा अपघात हायवामुळे झाला असून, याबाबत आम्ही माहिती घेत आहोत. दोन दिवसांत अपघात करणारा हायवा ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.