रिक्षात पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:39 PM2019-08-29T12:39:37+5:302019-08-29T12:40:26+5:30

औरंगाबादेतील कटकटगेट परिसरातील बुधवारी मध्यरात्रीची घटना 

youth kills a friend with a knife by arguing for a seat in rikshaw | रिक्षात पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

रिक्षात पुढच्या सीटवर बसण्याच्या वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

googlenewsNext
ठळक मुद्देवाद विकोपाला गेला आणि मित्राने चाकूने सपासप वार केले

औरंगाबाद : कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जात असताना रिक्षात बसण्यावरून दोन मित्रात झालेल्या वादातून  शेख आसिफ (२२,रा. लेबर कॉलनी) याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना कटकटगेट परिसरात आयपी मेसजवळ बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. 

लेबर कॉलनी परिसरातील रहिवासी शेख रिहान आणि आसिफ हे अन्य दोन मित्रासह कंदूरीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. लेबर कॉलनी, कटकटगेट मार्गे ते आयपी मेस समोरून टीव्ही सेंटर रस्त्यावर आले. यावेळी आसिफ आणि रिहान यांच्या रिक्षात पुढच्या सिटवर  बसण्यावरून वाद झाला. यावेळी चालकाने रिक्षा थांबविली आणि ते दोघे खाली उतरले. वाद विकोपाला गेला आणि रिहाने स्वत:जवळील चाकू काढून आसिफवर जोरात दोन वार केले. या घटनेत आसिफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे दृष्य पाहून त्याच्या सोबतचे मित्र घटनास्थळावरून पसार झाले.  घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि डी.बी. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आसिफला घाटी रूग्णालयात दाखल केले.  अपघात विभागातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  खूनाची घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून आरोपी जिन्सी परिसरातील आहे. 

आरोपीला पोलिसांकडूनअटक
आरोपी शेख रिहान हा पळून जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असल्याची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले दिसले. शिवाय घटनास्थळावरून चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. 

घटनास्थळी तणाव : आसिफचा चाकूने भोसकून खून झाल्याचे कळताच आयपी मेस परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तेथे तणावसदृष्य परिस्थीती निर्माण झाली होती. 

Web Title: youth kills a friend with a knife by arguing for a seat in rikshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.