युवराजला केले नातेवाईकांच्या स्वाधिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:54 AM2017-09-11T00:54:44+5:302017-09-11T00:54:44+5:30
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर रेल्वेस्थानकावर विसरुन राहिलेला तिन वर्षिय बालक रेल्वे पोलीस व अधिकाºयाच्या सतर्कतेमुळे नातेवाईकाच्या स्वाधिन करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर रेल्वेस्थानकावर विसरुन राहिलेला तिन वर्षिय बालक रेल्वे पोलीस व अधिकाºयाच्या सतर्कतेमुळे नातेवाईकाच्या स्वाधिन करण्यात आला.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील कांबळे कुटूंब १० सप्टेंबर रोजी रेल्वेने जाण्यासाठी नांदापूर रेल्वेस्टेशनवर सकाळी ९ च्या सुमारास आले होते. स्थानकावर रेल्वे आल्यानंतर कांबळे कुटुंबातील सदस्य रेल्वेत जागा पकडण्यासाठी धावून गेले. त्यांनी जागाही पकडली. रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या तीन वर्षीय युवराज रेल्वेमध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे सर्वच नातेवाईक घाबरले होते. रेल्वेतील काही प्रवासी कांबळे कुटूंबियांच्या सदस्यांना साकळी ओढण्याचा सल्ला देत होते. दरम्यान, त्याच डब्यात प्रवास करीत असलेले रेल्वे सुरक्षाबलातील एएसआय तात्याराव पिवळ यांनी कांबळे परिवातील सदस्यांना विचारणा करुन त्यांना धिर दिला. व लागलीच नांदापूर रेल्वेस्थानकावरील स्टेशन मास्तर अनिल डोंगरे यांच्यासोबत फोनद्वारे संपर्क साधला. विसरुन राहिलेल्या बालकाची माहिती दिली. तर त्यांनी काही क्षणातच बालक असल्याची माहिती पिवळ यांना दिली. नंतर पिवळ यांनी नातेवाईकांना बालक सुखरुप असल्याचे सांगितले. तर कांबळे कुटुंबियांनी आपल्या नातेवाईक गंगाधर कºहाळे यांना नांदापूर रेल्वेस्थानकावर पाठविले. नंतर स्टेशन मास्तर डोंगरे यांनी कºहाळे यांचा ओळख पुराव्याची खात्री करुन युवराजला त्यांच्या स्वाधिन केले. एका रेल्वे पोलीस अधिकाºयाच्या सतकर्तेने बालक सुखरुप सापडल्याने नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे यापूर्वीही हिंगोली रेल्वेस्थानकावर २० जुलै रोजी असाच एक हरवलेला बालक पिवळ यांनी त्याच्या नातेवाईकाच्या स्वाधिन केला होता.