जिल्हा परिषद, वकील संघ उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:42 AM2019-04-19T00:42:33+5:302019-04-19T00:43:12+5:30
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा परिषद, जिल्हा वकील संघ व बजाज आॅटो संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सचिन लव्हेरा, मोहित घाणेकर व सागर तळेकर हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा परिषद, जिल्हा वकील संघ व बजाज आॅटो संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सचिन लव्हेरा, मोहित घाणेकर व सागर तळेकर हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
पहिल्या बाद फेरीत जिल्हा वकील संघाविरुद्ध एआयटीजीने ७ बाद ११२ धावा केल्या. त्यांच्याकडून संकेत पाटीलने २८, अक्षय अकूडने २७ धावा केल्या. वकील संघाकडून रामेश्वर मतसागरने ३, तर मोहित घाणेकर व दिनकर काळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा वकील अ संघाने विजयी लक्ष्य १६ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मोहित घाणेकरने ८ चौकारांसह ५६ धावा केल्या. संतोष भारतीने ३ षटकार व ४ चौकारांसह ४४ धावा केल्या. एआयटीजीकडून रणजित पारडकरने २३ धावांत ४ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात जॉन्सन संघाने २० षटकांत १५१ धावा केल्या. नीरज शिमरेने २ षटकार व ४ चौकारांसह ४६, प्रवीण क्षीरसागरने २ षटकार व ४ चौकारांसह ३२ धावा केल्या. जिल्हा परिषदेकडून सय्यद आरीफने ३ व भाऊसाहेब गर्जेने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा परिषदने विजयी लक्ष्य १४ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सचिन लव्हेराने ४१ चेंडूंत ७ टोलेजंग षटकार व ७ खणखणीत चौकारांसह ८७ धावांची विजयी खेळी केली. त्याला विजय अडलाकोंडा याने २१ चेंडूंत ४ चौकारांसह २९ धावा करीत सुरेख साथ दिली. जॉन्सनतर्फे अनिरुद्ध पुजारी व एकनाथ बांगर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तिसºया सामन्यात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चरने १९ षटकांत १२२ धावा केल्या. त्यांच्याकडून गणेश गोरक्षकने ३५ व अरुण दाणीने २५ धावा केल्या. बजाज आॅटोकडून महेश पाडळकरने १३ धावांत ४ व सागर तळेकरने ३ व राजा चांदेकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात बजाजने विजयी लक्ष्य २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून कर्णधार सागर तळेकरने ७ चौकार व एका षटकारासह ६८, प्रथमेश शिरोडकरने ४ चौकारांसह ३४ व महेश पाडळकरने १७ धावांचे योगदान दिले. यश चव्हाण व सुनील भाले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.