जिल्हा परिषदेत कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:04 AM2021-03-25T04:04:57+5:302021-03-25T04:04:57+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारपासून जि. प. चे सर्व अधिकारी, कर्मचारी व येणाऱ्या अभ्यागतांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय ...
औरंगाबाद : जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारपासून जि. प. चे सर्व अधिकारी, कर्मचारी व येणाऱ्या अभ्यागतांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी घेतलेल्या निर्णयामुळे बुधवारी जिल्हा परिषद परिसरात विनाकारण येऊन जमा होणाऱ्यांची संख्या घटलेली दिसून आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी तपासणीसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. इद्रिस खान, डॉ. स्मिता जिगे आदींची नेमणूक केली. त्यांनी परिसरात येणाऱ्यांची प्रवेशद्वारावरच तपासणी केली. सुरक्षा रक्षकही येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारणा करत असल्याने बुधवारी कामाव्यतिरिक्त येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय घटल्याचे दिसून आले. शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा, अर्थसंकल्पाच्या कामात बांधकाम विभाग, वित्त विभागासह सामान्य प्रशासन विभागात रेलचेल होती. बुधवारी दिवसभरात २९ संशयितांचे स्वॅब पथकाकडून घेण्यात आले. ते पुढील तपासणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विषाणू निदान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिली.