जिल्हा परिषदेचे गोदाम फोडून लाखोंचा ऐवज लंपास; उस्मानपुरा पोलिसांकडून एकाला अटक

By राम शिनगारे | Published: December 23, 2022 07:01 PM2022-12-23T19:01:08+5:302022-12-23T19:04:56+5:30

गोदाम फोडून चोरी करणारा आरोपी सय्यद सुभान सय्यद जिलानी हा दीड महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता.

Zilla Parishad's godown was broken and looted of lakhs of rupees; One arrested by Osmanpura police | जिल्हा परिषदेचे गोदाम फोडून लाखोंचा ऐवज लंपास; उस्मानपुरा पोलिसांकडून एकाला अटक

जिल्हा परिषदेचे गोदाम फोडून लाखोंचा ऐवज लंपास; उस्मानपुरा पोलिसांकडून एकाला अटक

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे गोदाम फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री ज्योतीनगर भागात घडली. या प्रकरणात गुरुवारी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपीसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. सय्यद सुभान सय्यद जिलानी (२५, रा. उस्मानपुरा) या आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

जि. प.चे उपअभियंता प्रकाश बोर्डे (रा. मयूर पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार; ज्योतीनगर भागात जि. प.च्या यांत्रिकी विभागाचे गोदाम आहे. या गोदामाच्या पाठीमागील बाजूने भिंतीच्या विटा काढून, पत्रा उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. ६६ हजार १३४ रुपये किमतीचे रोलर चेंज विथ कपलिंगचे ७६९ नग, १६ हजार ३५० रुपये किमतीचे प्लंजर योग बॉडी १५० नग, ३ हजार ४०१ किमतीचे स्पेसर फॉर अय्यर बॉल असेम्ब्ली ३८ नग, ९ हजार ७५२ फ्लोअर बकेट फिक्सर ९२ नग, ४८ हजार ६४ किमतीचे अपर बॉल रबर सीट ७५१ नग, १ लाख ९९ हजार ६५५ रुपये किमतीचे लोअर बॉल सेट ७८३ नग असा ३ लाख ४३ हजार ३५६ असा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणात गुरुवारी गुन्हा नोंदविल्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोदामातील साहित्य लंपास करणाऱ्या टोळीतील संशयित दर्गा परिसरातील मैदानावर उभा आहे. त्यानुसार उपनिरीक्षक विनोद अबुल यांच्या पथकाला त्यांनी माहिती देत आरोपी सय्यद सुभान याच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गोदाम फोडल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली. त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

दीड महिन्यांपूर्वी सुटला कारागृहातून
गोदाम फोडून चोरी करणारा आरोपी सय्यद सुभान सय्यद जिलानी हा दीड महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली. सय्यद सुभान याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद असून, तो रेकॉर्डवरचा आरोपी असल्याची माहिती निरीक्षक बागवडे यांना दिली.

Web Title: Zilla Parishad's godown was broken and looted of lakhs of rupees; One arrested by Osmanpura police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.