जि.प. सभापतींनी घेतला अधिकाºयांच्या खुर्चीचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:44 PM2017-12-08T23:44:42+5:302017-12-08T23:44:46+5:30
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये प्रवास भाडे सवलतीच्या पाससाठी आलेल्या अपंगांना कर्मचा-यांनी दिवसभर ताटकळत ठेवले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच सभापती धनराज बेडवाल यांनी कार्यालयाला भेट दिली व समाजकल्याण अधिका-याच्या खुर्चीचा ताबा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये प्रवास भाडे सवलतीच्या पाससाठी आलेल्या अपंगांना कर्मचा-यांनी दिवसभर ताटकळत ठेवले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच सभापती धनराज बेडवाल यांनी कार्यालयाला भेट दिली व समाजकल्याण अधिका-याच्या खुर्चीचा ताबा घेतला. सभापती बेडवाल, जि. प. सदस्य किशोर बलांडे, बबन कुंडारे आदींनी समाजकल्याण विभागाला अचानक भेट दिली तेव्हा हजर नसलेल्या कर्मचाºयांची गैरहजेरी नोंदविण्यात आली. विभागामध्ये अनेक अपंग व्यक्ती सकाळपासून ठाण मांडून होते. पास देण्यासाठी अपंगांकडून त्यांची मूळ कागदपत्रे घेऊन कर्मचारी कार्यालयाबाहेर निघून गेल्यामुळे त्यांच्यावर दिवसभर ताटकळत बसण्याची वेळ आली. बेडवाल, बलांडे, कुंडारे आणि कलीम पटेल यांनी संबंधित कर्मचाºयांची चौकशी केली. तेव्हा ते हालचाल रजिस्टरमध्ये नोंद न घेता गायब असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे कार्यालयात हालचाल रजिस्टरही नव्हते. गैरहजर कर्मचा-यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती बेडवाल यांनी सांगितले.