जि.प. अध्यक्षांना स्मरणपत्र

By Admin | Published: May 28, 2014 11:49 PM2014-05-28T23:49:05+5:302014-05-29T00:38:36+5:30

बीड : जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (प्रोसेडिंग) जागेवर नाही़ प्रोसेडिंगसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांना सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी स्मरणपत्र धाडले आहे़

Zip Reminder of the President | जि.प. अध्यक्षांना स्मरणपत्र

जि.प. अध्यक्षांना स्मरणपत्र

googlenewsNext

 बीड : २८ आॅक्टोबर २०१३ रोजी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (प्रोसेडिंग) जागेवर नाही़ प्रोसेडिंगसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांना सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी स्मरणपत्र धाडले आहे़ २५ मे रोजी ‘लोकमत’मध्ये ‘जि़प़ मध्ये जेंव्हा प्रोसेडिंगला पाय फुटतात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती यांनी प्रोसेडिंग मिळविण्यासाठी हालचाली सुरु केल्या़ जि़प़ मध्ये २८ आॅक्टोबर २०१३ रोजी सर्वसाधारण सभा झाली होती़ ६ जानेवारी २०१४ रोती स्वीय सहायकामार्फत प्रोसेडिंग स्वाक्षरीसाठी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याकडे पाठविले होते़ त्याचे प्रोसेडिंग जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत मिळणे अपेक्षित होते; परंतु अद्याप प्रोसेडिंग मिळालेले नाही़ दरम्यान, १५ फेबु्रवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्यौ बैठकीचे प्रोसेडिंगही मिळालेले नसल्याचे स्मरणपत्रात नमूद आहे़ जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मधील तरतूदीनुसार मागील सभेचे कार्यवृत्त पुढील स्सभेत देणे आवश्यक असते; परंतु प्रोसेडिंग दिले नाही़ त्यामुळे विलंबाची जबाबदारी आपल्यावर राहील, असा इशाराही स्मरणपत्रात अब्दुल्ला यांना दिला आहे़ दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. (प्रतिनिधी) इनामदारांना नोटीस जि़प़च्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी एऩ ए़ इनामदार यांना २८ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या प्रोसेडिंगसाठी नोटीस बजावण्यात आली आहे़ यापूर्वीही त्यांना दोनवेळा नोटीस दिली आहे़ ‘चार्ज’ सोडतानाच आपण प्रोसेडिंग दिले होते़ त्यामुळे प्रोसेडिंगच्या प्रकरणाशी आपला संबंध नाही, असे एऩ ए़ इनामदार यांनी सांगितले़

Web Title: Zip Reminder of the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.