जि.प. सीईओंच्या खुर्ची, साहित्यावर जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:57 AM2017-07-19T00:57:59+5:302017-07-19T01:02:24+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) मधुकर आर्दड यांची खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई मंगळवारी कोर्ट आदेशानुसार करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) मधुकर आर्दड यांची खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई मंगळवारी कोर्ट आदेशानुसार करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील
अंधारी येथील जि. प. शाळा बांधकामाचे ४३ लाख
१७ हजार ६० रुपयांचे बिल थकविल्यामुळे जि. प. प्रशासनावर ही नामुष्की ओढवली.
या प्रकरणामागील घटनाक्रमही मोठा रंजक आहे. १९८८ साली पी. ए. चोपडा या कंत्राटदाराने अंधारीतील शाळा बांधण्याचे कंत्राट घेतले. १९९२ साली ती शाळा बांधून पूर्ण झाली; परंतु कंत्राटदाराला बिल देण्यासाठी तत्कालीन जि. प. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी टाळाटाळ केली. तेव्हापासून आजपर्यंत चोपडा यांनी वेगवेगळ्या मार्गाने लढा देत जि.प.कडे बिल मागण्यासाठी तगादा
लावला; परंतु जि.प.ने त्यांना बिल अदा केले नाही.
अखेर त्यांनी सिव्हिल कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने जप्तीचे आदेश जारी केले. त्यानुसार कोर्ट बेलिफ बऱ्हाणपुरे यांनी मंगळवारी जिल्हा परिषद सीईआेंचे वाहन व खुर्चीसह साहित्य जप्तीसाठी कारवाई सुरू केली; परंतु सीईओ तेथे नसल्यामुळे सकाळी ११ वाजेच्या कारवाईला सायंकाळी ४ वाजले.
खुर्ची व साहित्याला नोटीस चिकटवून ते साहित्य जप्त करण्यात आले.