जि.प. शिक्षकांचे पगार रखडले
By Admin | Published: June 24, 2014 12:55 AM2014-06-24T00:55:13+5:302014-06-24T01:09:15+5:30
सिल्लोड : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना पगारासाठी शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीद्वारे आॅन लाईन बिले सादर करण्याचे सांगितले होते
सिल्लोड : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना पगारासाठी शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीद्वारे आॅन लाईन बिले सादर करण्याचे सांगितले होते; परंतु काही शिक्षकांनी आॅन लाईन बिले सादर न केल्याने एप्रिल महिन्याचा पगार आॅफ लाईन करण्यात आला. या आॅन-आॅफ लाईनमुळे जून महिना संपत आला तरी शिक्षकांना मे महिन्याचा पगार मिळालेला नाही.
शालार्थ प्रणालीद्वारे आॅनलाईन बिले सादर करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. एप्रिल महिन्यात आॅनलाईन बिले सादर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात होती. काही शिक्षकांनी आॅनलाईन बिले सादर न केल्याने एप्रिल महिन्याचा पगार आॅफ लाईन काढण्याचा तात्पुरता आदेश शिक्षण विभागाने काढला. यामुळे मुख्याध्यापकांनी आॅफ लाईन बिले सादर करून शिक्षकांचे थकीत वेतन पुढील महिन्यात काढले.
मे महिन्याचा पगार आॅनलाईन होईल की आॅफलाईन या संभ्रमात काही मुख्याध्यापकांनी आॅनलाईन तर काही मुख्याध्यापकांनी आॅफलाईन बिले सादर केली. शिक्षण विभागाच्या आॅन-आॅफलाईन पद्धतीत जून महिना संपत आला तरी शिक्षकांना मे महिन्याचा पगार अद्यापपर्यंत मिळालेला नाही.
तालुक्यामध्ये १२१६ शिक्षक आहेत. यामध्ये ११२९ प्राथमिक शिक्षक, ८१ माध्यमिक, तर ६ केंद्रप्रमुखांचा समावेश आहे. १२१६ शिक्षकांना दरमहा ३ कोटी ४७ लाख ४० हजार ८३८ रुपयांचे बजेट आहे. शिक्षण विभागाच्या आॅन-आॅफलाईन पद्धतीत १२१६ शिक्षकांचा मे महिन्याचा पगार रखडलेला आहे.
आॅन-आॅफलाईनद्वारे सर्वच शिक्षकांनी आॅनलाईन बिले सादर न केल्याने पगार रखडला. या महिन्यात सर्व शिक्षकांचे आॅनलाईन बिले सादर केली जाईल. १ जुलैपासून सर्व शिक्षकांचे पगार आॅनलाईन महिन्याच्या पहिल्या तारखेला केले जाईल, असे बी.के. खरात, गटशिक्षण अधिकारी सिल्लोड यांनी सांगितले.