ZP Transfer: अखेर 'सुभेदारां'च्या संस्थानांना लावला सुरूंग; तात्काळ रुजू होण्याचे फर्मान

By विजय सरवदे | Published: May 16, 2023 02:40 PM2023-05-16T14:40:59+5:302023-05-16T14:43:28+5:30

ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जि.प. प्रशासनाने केल्या ६३ ग्रामसेवकांच्या बदल्या

ZP Transfer Order of immediate accession in Chhatrapati Sambhajinagar | ZP Transfer: अखेर 'सुभेदारां'च्या संस्थानांना लावला सुरूंग; तात्काळ रुजू होण्याचे फर्मान

ZP Transfer: अखेर 'सुभेदारां'च्या संस्थानांना लावला सुरूंग; तात्काळ रुजू होण्याचे फर्मान

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तथापि, कोणताही राजकीय अथवा संघटनांच्या दबावाखाली न येता तसेच बदलीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे फर्मान जि.प. प्रशासनाने सोडले आहे.

जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात कालरात्री उशिरापर्यंत 'सीईओ' विकास मीना  यांच्या मार्गदर्शनाखाली  ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यात आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक पर्यवेक्षक- २, औषध निर्माण अधिकारी- ७, आरोग्य सेवक पुरुष- २३, आरोग्य सहाय्यक पुरुष- ८, आरोग्य सेवक महिला- ३१, आरोग्य सहाय्यक महिला- ४, तसेच पंचायत विभागातील ग्रामसेवक- ६३,  ग्रामविकास अधिकारी- १०,  विस्तार अधिकारी पंचायत- ३ यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: ZP Transfer Order of immediate accession in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.