१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:51 PM2023-10-14T13:51:34+5:302023-10-14T13:52:01+5:30

सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात १२ मतदारसंघ असून तेथे पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

120 villages where voting will be held for the first time after independence this year | १२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान 

१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान 

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर विभागातील १२० गावच्या मतदारांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या गावात मतदानाची संधी मिळेल. येत्या ७ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोग गावांमध्ये मतदान केंद्रे उभारणार आहे. 

सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात १२ मतदारसंघ असून तेथे पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी बहुतेक गावांतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास करून डोंगर व नद्या ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे त्यांना निवडणूक प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होणे कठीण झाले होते. (वृत्तसंस्था)

बुलेटवरील बॅलेटच्या विजयाची कहाणी
७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी बस्तर विभागात १२६ हून अधिक नवीन मतदान केंद्रे उभारली जातील. यातील बहुतांश नवीन केंद्रे अंतर्गत आणि नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भागात असतील. ही नवीन मतदान केंद्रे बस्तरमधील भावी पिढ्यांना बुलेटवरील बॅलेटच्या विजयाची कहाणी सांगतील. 

Web Title: 120 villages where voting will be held for the first time after independence this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.