नक्षलवाद्यांचा अड्डा ते स्पोर्ट्स हब; 'बस्तर'ची ओळख बदलली! मुख्यमंत्री साय यांची महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:47 PM2024-08-23T12:47:37+5:302024-08-23T12:48:53+5:30
या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय जाते ते मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना. त्यांनी बस्तरला शांतता आणि समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.
छत्तीसगडमधील 'बस्तर', हे कधीकाळी आपल्या पौराणिकतेसाठी आणि नक्षलवादासाठी ओळखले जात होते. मात्र आता ते विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय जाते ते मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना. त्यांनी बस्तरला शांतता आणि समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.
बस्तर, जेथे रामायण काळात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी 13 वर्ष घालवली. ते आता आणखी एका ऐतिहासिक बदलाचे साक्षिदार होत आहे. कधी नक्षलवादाचा सामना करणारा हा भाग, आता खेळ, प्रामुख्याने फुटबॉच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) नारायणपूर जिल्ह्यात फुटबॉलसाठी एक नवे मैदान तयार केले आहे. ज्याने अलीकडेच दोन राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.
मुख्यमंत्री साय यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले. कारण, खेळामुळे या भागाचा केवळ विकासच होणार नाही, तर सामाजिक सुधारणाही शक्य आहेत, असे ते मानतात. त्यांच्या नेतृत्वात, AIFF आणि छत्तीसगड फुटबॉल संघाने बस्तरमध्ये अंडर-20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल चॅम्पिअनशिपचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. याचा उद्देश्य बस्तरला खेळाचे केंत्र अथवा स्पोर्ट हब बनविणे आणि याची सकारात्मक छबी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित करणे आहे.
एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, फुटबॉलच्या माध्यमाने समाज आणि अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने सुधारणा केली जाऊ शकते, यासाठी बस्तरचे हे परिवर्तन देशासमोर एक उदाहरण बनले. प्रशासनाच्या प्रोत्साहनांसह, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्याची क्षमता ओळखत याला प्रतिष्ठित फुटबॉल टोर्नामेन्ट्सचे आयोजन स्थळ म्हणून निवडले आहे. हा निर्णय विश्वास आणि परिवर्तन दोन्हींचे प्रतिक आहे.
मुख्यमंत्री साय यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीमुळे बस्तरमध्ये नक्षलवादाच्या जागी आता खेळाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. हा उपक्रम बस्तरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि योग्य नेतृत्वाने कोणत्याही क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणला जाऊ शकतो हे दर्शवणारा आहे. आता बस्तर छत्तीसगडचा गौरव बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.