निसर्ग वाचवण्यासाठी धोरण आखून काम करावे लागेल - मुख्यमंत्री विष्णुदेव साई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 09:27 AM2024-03-06T09:27:56+5:302024-03-06T09:29:07+5:30
भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.
रायपूर - हवामान बदल हा संपूर्ण जगासाठी मोठा धोका आहे. निसर्ग, हिरवळ आणि नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा अधिक उपाययोजना आणि प्रयत्नांची गरज आहे. कारण यामुळे अनियमित पर्जन्यमान, दीर्घकाळापर्यंत दुष्काळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यासारख्या समस्यांमुळे राष्ट्र आणि जग दोघांवरही परिणाम होत आहेत अशी चिंता छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी व्यक्त केली. हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी रणनीती तयार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या हस्ते दोन दिवसीय ‘छत्तीसगड क्लायमेट चेंज कॉन्क्लेव्ह २०२४’चं उद्घाटन करण्यात आले. त्याचसोबत बस्तर येथे 'छत्तीसगड राज्य कृती आराखडा ऑन क्लायमेट चेंज' आणि पारंपारिक आरोग्य पद्धतींवरील 'Ancient Wisdom' या पुस्तकाचे लोकार्पण केले. हवामान बदल आणि जागतिक आव्हाने यावर या कार्यक्रमातून चर्चा होत आहे. भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.
आज राजधानी रायपुर में दो दिवसीय "क्लाइमेट चेंज कॉन्क्लेव" का शुभारंभ किया।
— Vishnu Deo Sai (Modi Ka Parivar) (@vishnudsai) March 5, 2024
जलवायु परिवर्तन के प्रतिकूल प्रभावों के कारण अनियमित वर्षा, लंबे समय तक सूखा, चक्रवाती वर्षा, वर्षा ऋतु के समय परिवर्तन जैसी चुनौतियां पूरी दुनिया के साथ-साथ देश और प्रदेश के सामने भी हैं। जिससे निपटने… pic.twitter.com/rTDgQRNPC2
मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, आपण निसर्गाशी खेळ करत अधिकच्या सुख सुविधेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ज्यातून नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती बनत आहे. जलवायू परिवर्तनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यावर उपाय शोधण्याबाबत २०१५ मध्ये पॅरिसमध्ये करार झाला होता. ज्यात १९६ देशांनी सहभाग घेतला आणि आज आपण पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या जागतिक समस्येवर आपल्या सगळ्यांना मिळून तोडगा काढायचा आहे आणि त्यात आपल्याला नक्की यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्तीसगड क्लायमेट चेंज कॉन्क्लेव्ह २०२४ चं आयोजन करणाऱ्या राज्यातील विन विभाग आणि छत्तीसगड स्टेट सेंटर फॉर क्लायमेट चेंजच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. जलवायू परिवर्तनाच्या या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्याची भूमिका आणि भविष्यातील उपाययोजना मैलाचा दगड ठरेल असंही मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सांगितले. यावेळी वन आणि पर्यावरण मंत्री केदार कश्यप, आमदार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अनुज शर्मा, पद्मश्री पुरस्कार विजेते फुलबासन यादव, पद्मश्री पुरस्कार विजेते हेमचंद मांझी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते जागेश्वर यादव उपस्थित होते. या कार्यक्रमात हवामान बदलावर आधारित लघुपट दाखवण्यात आला.
दरम्यान निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली पाहिजे. हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी येणाऱ्या पिढ्या सुरक्षित राहण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करावे लागेल. यात तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या आदिवासी समाजाला निसर्ग खूप जवळून समजतो. अंदमान आणि निकोबारमधील जरावा जमातीचे लोक पूर किंवा भूकंप येण्याआधीच ओळखतात आणि डोंगरावर जातात असं वन आणि पर्यावरण मंत्री केदार कश्यप यांनी सांगितले.