Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसची अटीतटीची लढत; सरकार बनवण्यासाठी ५ जागांचा फरक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:59 IST2023-11-30T17:58:53+5:302023-11-30T17:59:15+5:30
Chhattisgarh Exit Poll: आज छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे.

Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसची अटीतटीची लढत; सरकार बनवण्यासाठी ५ जागांचा फरक
Chhattisgarh Exit Poll: गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली, दोन्हीबाजूने जोरदार प्रचारसभा घेतल्या. छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडले आहे. दरम्यान, आज छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे.
चार राज्यांत मोदींनी ४० सभा घेतल्या; थोड्याच वेळाच एक्झिट पोल येणार
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण जागा ९० आहेत. या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी केली होती. आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. यात भाजपला ३६ ते ४० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केली आहे, तर काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
हे निवडणूक सर्वेक्षण छत्तीसगडमधील १६,२७० लोकांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये ७७ टक्के ग्रामीण आणि २३ टक्के शहरी लोकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांच्याकडून मिळालेल्या आकडेवारीचा एक्झिट पोलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
यासोबतच ५६ टक्के पुरुष आणि ४४ टक्के महिलांचे सर्वेक्षण करून आकडेवारीत समाविष्ट तथ्ये काढण्यात आली आहेत. या आधारावर, एक्झिट पोल सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या भूपेश बघेल सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी लाट नाही. म्हणजेच येथे काँग्रेस सरकार स्थापन करू शकते, असा अंदाज आहे.
छत्तीसगडमधील एक्झिट पोल
भाजपा - ३६-४०
काँग्रेस -४०-५०
एकूण जागा -९०