कलावंतांना मानधन व घरकुल द्या; अन्यथा मंत्रालयासमोर गोंधळ-जागर

By साहेबराव हिवराळे | Published: May 21, 2023 09:24 PM2023-05-21T21:24:37+5:302023-05-21T21:24:45+5:30

महाराष्ट्र बैठकीत निघाला सूर : कोरोनात हाल; सध्याही नाही हाती जगण्याचे साधन

Give stipend and housing to artists; Otherwise agitation in front of ministry | कलावंतांना मानधन व घरकुल द्या; अन्यथा मंत्रालयासमोर गोंधळ-जागर

कलावंतांना मानधन व घरकुल द्या; अन्यथा मंत्रालयासमोर गोंधळ-जागर

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : कलावंतांना त्यांच्या कला सादरीकरणास वाव दिला तर त्यांची कुटुंबे उभी राहतात, अन्यथा त्यांना रोजंदारीवरही कुणी कामाला नेत नाहीत, त्यामुळे शासनाने मानधन तसेच घरकुलाची योजना राबवावी, अन्यथा कलावंत मंत्रालयासमोर गोंधळ-जागर आंदोलन करून व्यथा मांडणार असल्याचा इशारा रविवारी महाराष्ट्रस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगरात देण्यात आला.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्रातील कलवंतांच्या दिशादर्शक बैठक रविवारी झाली. यात मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष सोमनाथ गायकवाड म्हणाले की, कलावंतांचे सर्वत्र हाल असून, त्यांना जीवन जगताना चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दाखवावे लागते. परंतु त्या तुलनेत त्यांच्या पदरी काही पडत नाही. राहण्यापासून ते कलाची साधन सांभाळताना होणारी तारेवरची कसरत जीवघेणी ठरत आहे. बहुतांश कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. कला सादरीकरणाच्या वेळेत त्यांच्या हक्काची जाणीव कुणी करून देत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभारणार आहोत. त्यासाठी कलावंतांनी साथ देण्याची गरज आहे, असेही सोमनाथ गायकवाड स्पष्ट केले. राज्यव्यापी कलावंत क्रांती परिषद, मानधनप्राप्ताची व वंचिताची यादी तयार करणे, प्रत्येक जिल्ह्यात कलावंताची नोंदणी, घरकुल व मानधन तसेच इतर कलावंताच्या प्रश्नावर आवाज उठविणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर यावेळी माजी सरपंच उत्तम अंबिलढगे, बबनभाई शेख, तेजराव सपकाळ,छाया नांदेडकर , मेघा डोळस, नानासाहेब कारके, ॲड. शाम खंदारे आदींची उपस्थिती होती. कडूबाई खरात, मीरा उमप या गायकांनी भीमगीताने मौलाना आझाद संशोधन केंद्रातील वातावरण प्रफुल्लित केले होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही गायकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम अंबिलढगे यांनी केले, तर मान्यवरांची स्वागत छाया नांदेडकर यांनी मानले.
कॅप्शन... मौलाना आझाद संशोधन केंद्रात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्रातील कलावंतांच्या दिशादर्शक बैठकीत कडूबाई खरात, मीरा उमप या गायिकांनी भीमगीत गायन करताना.

Web Title: Give stipend and housing to artists; Otherwise agitation in front of ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.